New Born Baby (Goa) Dainik Gomantak
गोवा

आई! सांग ना माझी काय चूक

गोव्यात एका दिवसाचे अर्भक झाडीत रडताना सापडले

Dainik Gomantak

Goa: साखळी शहरात (Sankhalim City) नवजात अर्भकाला कचऱ्यात टाकून देण्याच्या घटनेला पाच महिने होत असतानाच, अशीच आणखीन एक घटना साखळीजवळील मायणा-न्हावेली (Maina - Navelim) गावात घडली आहे. मायणा-न्हावेली येथे एक दिवसाच्या जिवंत नवजात अर्भकाला (मुलगी) झाडीत टाकून देण्याची हृदयद्रावक आणि तेवढीच अंगावर काटा येणारी घटना घडली आहे.

मायणा येथे बेवारस अवस्थेत सापडलेल्या नवजात अर्भकाला बांबोळीच्या गोमेकॉत (GMC, Bambolim) दाखल केले असून, त्याची स्थिती नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे मायणा - न्हावेलीसह साखळी भागात खळबळ माजली असून, तेवढाच संताप व्यक्त होत आहे. हे अर्भक कोणी व का टाकून दिले, त्याबाबत गुंता निर्माण झाला आहे. एखाद्या माता-पित्याने मुद्दामहून, की अनैतिक संबंधातून जन्माला आल्याने हे नीच कृत्य केले. त्याबाबत गूढ निर्माण झाले आहे. डिचोली पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला असून (Reported a crime against the unknown), संबंधित माता-पित्याचा पोलिस शोध घेत आहेत.

हृदयद्रावक घटना...

उपलब्ध माहितीनुसार, मायणा भागात कार्यरत असलेल्या एका खाण कंपनीच्या जेटीवरील सुरक्षा रक्षकाला काल सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास तेथील झाडीतून मूल रडत असल्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी त्याठिकाणी जावून पाहिले असता, नवजात अर्भकाला त्याठिकाणी टाकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. लागलीच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्भकाला कापडात गुंडाळून टाकून दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. 108 रुग्णवाहिलेला पाचारण केल्यानंतर नवजात अर्भकाला उपचारार्थ इस्पितळात नेण्यात आले. हे अर्भक एक दिवसाचे असून, काल (मंगळवारी) रात्री त्याला त्याठिकाणी टाकून दिल्याचा अंदाज आहे.

या घटनेनंतर डिचोलीचे पोलिस निरीक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मायणा-न्हावेली भागात शोध मोहीम हाती घेतली. भाड्याच्या खोलीत राहणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. सामाजिक आरोग्य केंद्रासह इस्पितळांनी नोंद झालेल्या गर्भवतींबद्दल माहिती मिळवली. मात्र आज सायंकाळपर्यंत पोलिसांना कोणतेच धागेदोरे मिळालेले नाहीत. पोलिस निरीक्षक श्री. गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रजित मांद्रेकर याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

साखळीतील घटनेची पुनरावृत्ती

पाच महिन्यापूर्वी म्हणजेच गेल्या 5 एप्रिल रोजी साखळी शहरात अशीच हृदयद्रावक घटना उघडकीस आली होती. साखळी सामाजिक आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूने प्लास्टिक पिशवीत गुंडाळून एक दिवसाचे नवजात अर्भक टाकण्यात आले होते. या प्रकरणाचा छडा लागला नसतानाच, जवळपासच्या मायणा भागात याच घटनेची पुनरावृत्ती घडल्याने साखळी भागात खळबळ माजली असून, अनेक तर्कवितर्क पुढे येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT