ईएसआय इस्पितळात सेवा देणारे डॉ. उदय काकोडकर, डॉ. एडविन गोम्स आणि डॉ. विश्वजित फळदेसाई यांचा सत्कार करताना डॉ. मनोज प्रभुदेसाई Image by Sushant Kunkolienkar
गोवा

Goa: मडगावचे ईएसआय इस्पितळ पुन्हा कामगारांच्या सेवेसाठी सज्ज

गोव्यातले मडगावचे ईएसआय इस्पितळ उद्यापासून पुन्हा विमा योजनेखाली उपचार घेणाऱ्या कामगारांसाठी खुले होणार आहे

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात (Goa) पहिली कोविड (COVID-19) लाट आल्यावर मागच्या वर्षी 16 मार्चपासून कोविड इस्पितळात (COVID Hospital) रुपांतरीत केलेले मडगावचे (Margao) ईएसआय इस्पितळ उद्यापासून पुन्हा विमा योजनेखाली उपचार घेणाऱ्या कामगारांसाठी खुले होणार आहे. उद्यापासून या इस्पितळांतील सर्व ओपीडी (OPD) कामगारांसाठी सुरू होतील अशी माहिती या इस्पितळाचे वैदकीय अधीक्षक डॉ. विश्वजित फळदेसाई यांनी दिली. (Goa: Margao's ESI Hospital to re-function from Thursday)

16 मार्च 2020 पासून कोविड इस्पितळ म्हणून जाहीर केलेल्या या इस्पितळात 24 मार्च पासून कोविड रुग्णांवर उपचार सुरू झाले होते. या इस्पितळात पहिल्या लाटेत सुमारे तीन हजार तर दुसऱ्या लाटेत दीड हजार रुग्णांवर उपचार केले. या इस्पितळात बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी सुमारे 94 टक्के होती असे डॉ. फळदेसाई यांनी सांगितले. सुरवातीला डॉ. एडविन गोम्स आणि नंतर डॉ. उदय काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे उपचार चालू होते. या दीड वर्षात किमान 900 कर्मचारी या इस्पितळात कोविड नियंत्रणात आणण्यासाठी वावरले अशी माहिती त्यांनी दिली.

या दरम्यान ईएसआयखाली उपचार घेणाऱ्या रुग्णांची काही प्रमाणात हेळसांड झाली पण उद्यापासून या रुग्णांना पूर्वीप्रमाणेच सर्व सोयी उपलब्द होतील असे डॉ. फळदेसाई यांनी सांगितले.

हे इस्पितळ कोविडसाठी आता बंद झाले असले तरी ताप येणाऱ्या रुग्णांना तपासण्यासाठी एक ओपीडी चालूच राहणार असून आता या इस्पितळात ईएसआय रुग्णांसाठी लसीकरण केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान काल कोविडच्या दरम्यान सेवा देणारे डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांचा सत्करही करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT