Goa: Elvis Gomes Sushant Kunkalekar
गोवा

Goa: आपल्‍या काँग्रेस प्रवेशाने कुंकळ्ळीतील लोक खूष

Goa: काँग्रेस प्रवेशानंतर एल्‍विस गोम्‍स यांनी व्‍यक्त केली पहिली प्रतिक्रिया

Santosh Kubal

मडगाव : आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे कुंकळ्ळीतील लोक नाराज नाहीत तर उलट खूष झाले आहेत. त्यांचा आवाज, समस्‍या (Problems) वरपर्यंत पोचविण्याची क्षमता असलेला कोणी तरी आला आहे, असा विश्वास आता त्यांच्यात निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया एल्विस गोम्स ( यांनी व्यक्त केली. पूर्वाश्रमीचे नोकरशहा आणि नंतर आम आदमी पक्षाचे राज्य निमंत्रक राहिलेले एल्विस गोम्स (Elvis Gomes) यांनी काल रविवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे कुंकळ्ळीतील काही काँग्रेस कार्यकर्ते (congress suporter) नाराज आहेत अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेवर प्रतिक्रिया व्‍यक्त करताना गोम्‍स म्‍हणाले की, आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करावा ही कुंकळ्ळीच्या लोकांची इच्छा होती. त्यात सर्वसामान्‍यांबरोबरच काही व्यावसायिक (Professional) आणि व्यापारउदीम करणाऱ्यांचाही समावेश आहे. भाजप सरकारच्या आडमुठ्या धोरणांमुळे त्यांचे व्यवसाय संपण्याच्या वाटेवर आहेत. अशा लोकांच्‍या व्यथा योग्य ठिकाणी पोहोचवून न्याय देणारा त्‍यांना कोणी तरी पाहिजे होता. पूर्वीचा नोकरशहा असल्याने त्यांच्या व्यथा आपण योग्य ठिकाणी मांडून त्यावर तोडगा काढू शकतो असा त्‍यांना विश्वास (confidence) आहे.

म्‍हणून केला काँग्रेस प्रवेश

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे कारण सांगताना गोम्स म्हणाले, गोव्यात केवळ काँग्रेस आणि भाजप हे दोनच मुख्य धारेतील पक्ष असून इतर पक्षांना येथे जनाधार नाही. एकेकाळी मगोकडे तो होता, पण आता नाही. भाजपच्या कारभाराला लोक विटले आहेत. या पक्षाला सत्तेवरून खाली खेचायचे असल्यास काँग्रेस हाच सक्षम पर्याय असल्याचे सर्वांचे मत आहे.
त्‍यालाच मिळेल उमेदवारी
कुंकळ्ळीची काँग्रेसची उमेदवारी तुम्हाला मिळणार का, असे विचारल्यावर गोम्‍स म्‍हणाले की, याचे उत्तर फक्त काँग्रेस महासमिती देऊ शकेल. मात्र जो उमेदवार लोकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळण्यास सक्षम आहे, जो मतदारांमध्ये लोकप्रिय आहे आणि ज्याची पार्श्वभूमी इकडून तिकडे उडी मारण्‍याची नाही त्यालाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT