37th National Games Goa  Dainik Gomantak
गोवा

37th National Games: पदकाच्या शोधात गोव्याचा फुटबॉल संघ; घरच्या मैदानावर विजेतेपदासाठी प्रयत्नशील

पुरुष विभागातील मोहीम आजपासून सुरू, सेनादलाविरुद्ध सामना

किशोर पेटकर

37th National Games: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला पुरुष फुटबॉलमध्ये कधीही सुवर्णपदक मिळालेले नाही, अखेरच्या वेळेस बारा वर्षांपूर्वी ब्राँझपदक मिळविले, तर त्यापूर्वी दोन वेळा रौप्यपदक मिळविले होते. आता घरच्या मैदानावर डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ विजेतेपदासाठी प्रयत्नशील असेल.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सोमवारी (ता. ३०) गोव्याची अ गटातील पहिली लढत सेनादलाविरुद्ध होईल.

कर्नाटक, पंजाब हे या गटातील अन्य संघ आहेत. प्रतिस्पर्धी मातब्बर असल्याने गोव्यासाठी सर्व सामने महत्त्वाचे असतील. ब गटात गतउपविजेता केरळ, मेघालय, महाराष्ट्र व मणिपूर हे संघ आहेत.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस सुरवात होण्यापूर्वी बाणावली येथील मैदानावर डेरिक यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत अ गट विजेता बनून मुख्य फेरी गाठली होती.

मात्र त्या संघातील दहा खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत खेळत नाहीत. चर्चिल ब्रदर्स (आय-लीग स्पर्धा), धेंपो स्पोर्टस क्लब व स्पोर्टिंग क्लब द गोवा (तृतीय श्रेणी आय-लीग स्पर्धा) या संघांतील प्रमुख खेळाडू उपलब्ध नाहीत.

गोव्याचा संघ

ओझेन सिल्वा, जोसेफ क्लेमेंत, क्लाईव्ह मिरांडा, उमंग गायकवाड, प्रचीत गावकर, क्लेन्सियो पिंटो, श्रीधरनाथ गावस, डेल्टन कुलासो, जोशुआ डिसिल्वा, रीझव्हन फर्नांडिस, व्हेलिंग्टन फर्नांडिस, दिशांक कुंकळीकर, मेव्हन डायस, जॉयविन कार्नेरो, लीव्हन कास्ताना, सनिज बुगडे, आर्नोल्ड ऑलिव्हेरा, रोनाल गावकार, जॉर्ज डिसोझा, ब्रायसन परेरा. संघ व्यवस्थापक ः अंतिनियो पांगो, मुख्य प्रशिक्षक ः डेरिक परेरा, साहाय्यक प्रशिक्षक ः रेमुस गोम्स.

गोव्याचे साखळी फेरी वेळापत्रक

तारीख ३० ऑक्टोबर ः विरुद्ध सेनादल

तारीख १ नोव्हेंबर ः विरुद्ध कर्नाटक

तारीख ३ नोव्हेंबर ः विरुद्ध पंजाब

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT