37th National Games: करीना शिरोडकर हिने जम्मू-काश्मीरच्या जिया चौधरीचा 30-15 गुण फरकाने पराभव करीत 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. राज्यासाठी यापूर्वीचे सुवर्णपदक मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये बाबू गावकर याने जिंकले होते.
पूर्वाश्रमी तायक्वांदोपटू असलेल्या करीना हिने नव्या खेळात शानदार कामगिरी करताना महिलांच्या टँडिंग प्रकारात 80-85 किलो वजनगटात बाजी मारली.
23 वर्षीय करीनाचे हे राष्ट्रीय पातळीवर पेंचाक सिलाट खेळातील पहिलेच पदक ठरले. यापूर्वी तिने तायक्वांदो खेळात पदके जिंकलेली आहेत.
विशेष बाब म्हणजे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त करीनाने तायक्वांदोऐवजी पेंचाक सिलाट खेळण्यास सुरवात केली आणि अवघ्या काही दिवसांतच तिने मार्शल आर्ट खेळात पारंपगतता संपादन केली.
रविवारी गोव्याला पेंचाक सिलाट खेळात आणखी तीन पदके मिळाली. पुरुष गटात तिन्ही ब्राँझपदके मिळाली. सागर पालकोंडा याने 85-90 किलो वजनगटात, सिराज खान याने 09-95 किलो वजनगटात, तर महंमद इरफान खान याने 65-70 किलो वजनगटात बाजी मारली.
गोव्याची आता 21 पदके
पेंचाक सिलाट खेळात गोव्याने 1 सुवर्ण, 1 रौप्य व 10 ब्राँझ मिळून 12पदके जिंकली आहेत. एकंदरीत गोव्याने या स्पर्धेत 2 सुवर्ण, 4 रौप्य व 15 ब्राँझ मिळून 21 पदके पटकावली आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.