covid news Dainik Gomantak
गोवा

Goa Update: राज्यात कोरोनाचे 150 नवे रुग्ण; बळींची संख्या मात्र शून्यावर

मागील पाच दिवसांत सहा रूग्ण दगावले आज मात्र दिलासा

दैनिक गोमन्तक

राज्यात गणेश चतुर्थीच्यापार्श्वभूमीवर धामधूम सुरु असली तरी गेले काही दिवस कोरोना बळीच्या आकड्याने गोवेकरांची काळजी वाढवली होती. मात्र आज यातून काहीसा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात कोरोनाचे 150 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामूळे नागरिकांनी सर्वत्र उत्सवाचे वातावरण असले तरी काळजी घेणे आवश्यक आहे.

( Goa 150 new covid cases 30 august)

आज आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी नुसार आज 1126 कोरोना चाचण्या केल्या गेल्या यापैकी 150 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 177 रुग्ण कोरोनामूक्त झाले आहेत. तसेच आज एक ही कोरोना बळी नाही. राज्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 846 इतकी झाली आहे. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 98.12 एवढा झाला आहे.

गोव्यातील एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 118 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 लाख 51 हजार 309 जण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: परोडा खून प्रकरणात मध्य प्रदेशातील आरोपीला अटक

गोवा विद्यापीठातही Job Scam! समित्यांमध्ये केरळीयनांची नियुक्ती; गोवा फॉरवर्डचा घणाघात

Goa BJP: महायुतीच्या यशात गोव्याचा 'लक फॅक्टर'! सावंत, राणेंचा प्रचार ठरला लाभदायी

Goa Bank Fraud: गोव्यात हातचलाखी करून खातेदारांना लाखोंची टोपी! महिला बँक कर्मचाऱ्यास अटक; पोलिस निरीक्षकाची तपासात हलगर्जी

UN Report: महिलांसाठी घरचं बनले सर्वात धोकादायक ठिकाण; संयुक्त राष्ट्रांच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT