Madgaon Schools Dainik Gomantak
गोवा

Goa: मडगाव मधील सहा शाळांचा 100 टक्के निकाल

यंदा मडगावमधून (Madgaon) 1160 पैकी 1153 विद्यार्थी उत्तिर्ण झाले. सालसेत तालुक्याचा निकाल 99.7 टक्के लागला.

दैनिक गोमन्तक

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने (Goa Secondary and Higher Secondary Board) जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात मडगावमधील (Madgaon) दहा पैकी सहा शाळांचे (Schools) 100 टक्के निकाल लागला. या मध्ये फातिमा कॉनवेट, न्यू ईरा, पोप्युलर, श्री दामोदर, प्रेझेंटेशन कॉनवेंट व बोर्डा येथील सरकारी शाळांचा समावेश आहे. भाटिकर मॉडेलचा 99.24, महिला व नुतन इंग्लिशचा 99.36, लॉयलाचा 98.31 व होली स्पिरिटचा 98.78 टक्के निकाल लागला.

यंदा मडगावमधून 1160 पैकी 1153 विद्यार्थी उत्तिर्ण झाले. सालसेत तालुक्याचा निकाल 99.7 टक्के लागला. या तालुक्यात एकुण 66 शाळा आहेत. त्यातील 4 शाळा सरकारी असुन 5085 विद्यार्थी यंदा दहावीत होते.  यंदाच्या निकालाबद्दल शाळा प्रमुखांनी समाधान व्यक्त केले. रवीन्द्र केळेकर विद्यामंदिराचे मुख्याध्यापक अनंत अग्नी म्हणाले की आमच्या शाळेचा समाधानकारक निकाल लागला आहे. जरी अंतिम परिक्षा न घेता वर्षभर घेतलेल्या चाचणी परिक्षातुन हा निकाल तयार केलेला असला तरी कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय झालेला नाही.  ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जी टक्केवारी अपेक्षीत होती त्याचप्रमाणे त्यांना मिळालेली आहे. 

 पोप्युलर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सुचित्रा देसाई (Suchitra Desai) यांनी सांगितले की  ज्या विद्यार्थ्यांनी परिक्षांमध्ये जसे गुण मिळविले तसाच निकाल लागलेला आहे. आपल्या शाळेत प्रथम आलेल्याची टक्केवारी 93.88 आहे. जे विद्यार्थी पहिल्या पाच ते दहामध्ये अपेक्षीत होते त्यानी त्या प्रमाणे गुण मिळविले असे देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT