Dr Shivanand Bandekar|GMCH  Dainik Gomantak
गोवा

'...त्यामुळे राज्यात मास्कबंदी नाही'

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागलीय

दैनिक गोमन्तक

कोविडची लाट चार महिन्यांच्या फरकाने येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे राज्यात आताच मास्कबंदी करता येणार नाही. मास्कबंदीचा निर्णय जून-जुलैमध्ये आढावा घेऊन घेतला जाईल. असा तज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अनेक राज्यात मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे.

तसेच, कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे, अशा परिस्थितीत एनसीआर जिल्हे आणि लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी सर्वांसाठी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याबाबत लोकांना जागरुक करावे, असे निर्देशही मुख्यंमंत्री योगींनी दिले आहेत.

महाराष्ट्रात परत एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. परिणामी राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय देखील सतर्क झाले असून केंद्राकडून पाच राज्यांना पत्र लिहिण्यात आले आहे.

दिल्लीवर कोरोनाचे सावट
दिल्ली, नोएडा, एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. येथील पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) 8 टक्क्यांवर गेल्याने लोक चिंता व्यक्त करत आहेत. मंगळवारी 24 तासात 632 नवे कोरोना रुग्ण दिल्लीत आढळून आले आहेत, तर सोमवारी 501 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यामुळे दिल्लीत 28 टक्क्यांनी रुग्ण वाढत असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांत दिल्लीत कोरोना रुग्णवाढ तिप्पट प्रमाणात होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT