Goa medical suspension news Dainik Gomantak
गोवा

GMC Doctor Suspended: "जिथे अपमान झाला, तिथेच माफी मागितली पाहिजे" गोमेकॉ प्रकरणी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया

GMC controversy Goa: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन केल्यानंतर आंदोलकांनी तीन महत्वाच्या मागण्या कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्यासमोर ठेवल्यात

Akshata Chhatre

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) रुग्णालयातील डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या निषेधार्थ आंदोलन केल्यानंतर आंदोलकांनी तीन महत्वाच्या मागण्या कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्यासमोर ठेवल्यात. यानंतर डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी प्रकरणात पहिल्यांदा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

"माफी मागितलीच पाहिजे"

गोमेकॉतील निवासी डॉक्टर, विद्यार्थी, विभाग प्रमुख आणि आयएमए गोवा शाखेचे पदाधिकारी सोमवार (दि.९) रोजी झालेल्या आंदोलनात सामील होते. "माझा अपमान झालाय, आरोग्यमंत्र्यांनी घटना घडलेल्या कॅज्युअल्टीमध्येच येऊन सार्वजनिकरित्या माझी मागितली पाहीजे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही आमचा संप सुरूच ठेवू" असं डॉ. रुद्रेश कुट्टीकर म्हणाले आहेत.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या काय?

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात झालेल्या आंदोलनात तीन मागण्या समोर ठेवण्यात आल्या आहेत आणि सर्व डॉक्टरांच्या वतीने डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना निवेदन सादर केले.

  • संपूर्ण प्रकरणाचे चित्रीकरण करणाऱ्यांवर, गुन्हा नोंद करा.

  • आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी जीएमसीत येऊन डॉ. रुद्रेश यांची माफी मागावी.

  • जीएमसीतील 'व्हीआयपी पद्धत' बंद करावी.

या मागण्या सादर केल्यानंतर कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी माध्यमांशी संवाद साधून संदर्भातील माहिती सादर केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. रुद्रेश यांच्या निलंबनाचे आदेश अद्याप जारी केलेले नाहीत, तसेच आरोग्यमंत्री मंत्री विश्वजित राणे यांच्या जाहीर माफीबद्दल मंत्रालयाच्या कार्यालयात संदेश पाठवण्यात आला असून प्रतिसादाची वाट पहिली जातेय.

आंदोलकांची मागणी पूर्ण करत यापुढे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात व्हिडिओग्राफी करण्यास आता बंदी घालण्यात आली असून पोलिस देखील तैनात केले जातील आणि कडक एसओपी तयार करण्यासाठी ४ विभागीय अधिकारी नेमण्यात येणार आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे निलंबनाच्या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT