Goa News Gomantak Digital Team
गोवा

Goa News : रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय द्या

संघटनेची मागणी : आर्थिक साहाय्यासाठी निवेदन

गोमन्तक डिजिटल टीम

सार्वजनिक बांधकाम खात्यातील नियमित तसेच रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आज गोवा सरकारी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांची भेट घेतली.

रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना खात्याच्या कर्मचारी संस्थेमध्ये समावेश करून त्यांना न्याय द्यावा. विजेशी संबंधित धोकादायक कामे करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना किंवा आर्थिक साहाय्य उपलब्ध करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देविदास यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मंत्र्यांची भेट घेतली.

मंत्र्यांचे आश्‍वासन

काहीवेळा काम करताना या कर्मचाऱ्यांना धोका पोहचू शकतो, अशावेळी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य किंवा विमा मिळावा, यासाठी विमा योजना लागू करावी. यासंदर्भात वीज खात्याला त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात येईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

बैठकीत निर्णय घेणार

ओपा, साळावली, अस्नोडा, साखळी, चांदेल, वाळपई, काणकोण या ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी आवश्‍यक असलेल्या सुविधा उपलब्ध केल्या जाव्यात अशी मागणी संघटनेने केली. मागण्या ऐकून घेऊन त्याचा अभ्यास पुन्हा एकदा बैठक घेऊन निर्णय घेऊ, काब्राल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT