Education Dainik Gomantak 
गोवा

‘मुलींनाही शिकण्‍याची समान संधी मिळायला हवी’

नेहा फरास आणि सुकन्या केरकर यांचा सन्मान करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

पेडणे: मुलांसारखे मुलींनाही शिकण्याची व आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी द्या, असे उद्‌गार नेहा फरास यांनी काढले. मधलावाडा-केरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात आयोजित गौरव सोहळा कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. दरम्‍यान, यावेळी शाळेच्या दोन माजी विद्यार्थिनी ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केलंय, त्या नेहा फरास व सुकन्या केरकर यांचा सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी, त्यांना आपल्या भविष्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच त्‍यांच्‍या चांगल्या कार्याची दखल घेण्यासाठी असे कार्यक्रम राबवावे लागतात, असे शाळाप्रमुख यशश्री यांनी सांगितले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भीमा देवजी, पंच नमिता केरकर व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

या मान्यवरांच्या हस्ते भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृतमहोत्‍सवी वर्षानिमित्त पतंजली योगा आयोजित सूर्यनमस्कार उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्‍तिपत्रके देण्यात आली. शेवटी पालकांसाठी काही स्‍पर्धा घेऊन त्‍यांनाही बक्षिसे देण्यात आली. शिक्षिका यशश्री नाईक यांनी स्‍वागत केले. सोनाली हरमलकर यांनी सूत्रसंचालन केले. विद्या मोरजकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT