Goa Police Crime News: Daiinik Gomantak
गोवा

Goa News: मानवी तस्करीतील ‘ती’ मुलगी मायदेशी रवाना

Goa News: मानवी तस्करीतून सुटका केलेल्या केनियातील मुलीला काल मायदेशात मोपाच्या मनोहर विमानतळावरून पाठवण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Goa News: मानवी तस्करीतून सुटका केलेल्या केनियातील मुलीला काल मायदेशात मोपाच्या मनोहर विमानतळावरून पाठवण्यात आले. ‘अर्ज’ या बिगर सरकारी संस्थेच्या तक्रारीवरून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिची सुटका करण्यात आली होती.

पोलिसांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या मदतीने ही कारवाई केली. ‘अर्ज’च्या तक्रारीनंतर गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला होता.

१३ डिसेंबर रोजी केनियातील या मुलींची मुक्तता हणजुणे पोलिसांनी केली होती. ‘हवाला’ व्यवहारांचा माग काढताना या मुली पोलिसांना सापडल्या होत्या.

उपविभागीय अधिकारी या मुलींना त्यांच्या मायदेशी पाठवण्याविषयी आग्रही होते. त्यांनी ही जबाबदारी ‘अर्ज’ या संस्थेकडे सोपवली.

मोपातून मुंबई आणि मुंबईतून केनियाला जाणाऱ्या विमानात ही मुलगी बसेल याची खातरजमा करावी ही जबाबदारी अर्जकडे सोपवण्यात आली होती.

‘अर्ज’ने विमान तिकीट विकत घेतले. केंद्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या मुलींच्या परत पाठवणीत मदत करेल, अशी व्यवस्था केली. पोलिसांनी एका मुलीला या दलाकडे सुपूर्द केले.

त्यानंतर मोपावरून मुंबई आणि मुंबईतून केनियात जाण्याची व्यवस्था केली. ‘अर्ज’ने ती मुलगी केनियात आपल्या घरी सुखरुप पोचल्याची खात्री केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist Car Stunt: एकाच कारमध्ये 10 तरुण, दोघे चक्क डिकीच्या आत; बागा रोडवर पर्यटकांचा थरारक स्टंट! व्हिडिओ व्हायरल

LPG Cylinder Price Hike: सर्वसामान्यांना मोठा दणका, गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ; आजपासून नवे दर लागू

Horoscope: जूनचा पहिलाच दिवस 'या' राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'; करिअरमध्ये सुवर्णसंधी, बँक बॅलन्स वाढणार

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

SCROLL FOR NEXT