Girl commits suicide due to exam stress in ponda Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात परीक्षेच्या ताणामुळे मुलीने संपवले जीवन

नाझिया खुर्हीद शेख (18, रा. बोंडबाग-बेथोडा, फोंडा) हिने परीक्षेच्या तणावामुळे नक्तेश्वर हॉल जवळील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

अनेक विद्यार्थी परीक्षेच्या भीतीपोटी टोकाचे पाऊल उचलताना आपल्याला दिसतात. असाच एक प्रकार फोंड्यात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना नाझिया खुर्हीद शेख (18, रा. बोंडबाग-बेथोडा, फोंडा) हिने परीक्षेच्या तणावामुळे नक्तेश्वर हॉल जवळील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान तिला फोंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Girl commits suicide due to exam stress in ponda)

पीएसआय नितेश काणकोणकर यांनी केलेल्या चौकशीत समोर आले की नाझिया नैराश्याने ग्रासली होती. या घटनेच्या पाच दिवसांपूर्वी तिने आपला डावा हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ती फार्मागुडी येथील महाविद्यालयात इयत्ता 11वीत शिकत होती.

तिने विठोबा मंदिराजवळील अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मयत बोंडबाग बेतोडा येथे राहत असून ती तिच्या मामाकडे आली होती. परीक्षेच्या तणावामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा संशयित गुन्ह्याची पोंडा पोलिसांनी नोंद केली. दरम्यान याची पुढील चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी दीर्घायुष्याचे रहस्य समुद्राच्या तळाशी? व्हेल माशांमधील 'या' प्रथिनामुळे माणूस जगू शकणार 200 वर्षे! संशोधनातून खुलासा

मुंबई इंडियन्समध्ये मोठा फेरबदल? हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात, आता सूर्या नव्हे तर तिलक वर्माकडे संघाची धुरा!

Goa Govt Jobs: गोव्यात 709 पदांची मेगा भरती! 16 मेपासून सीबीटी परीक्षा; पोलिस खात्यात 596 जागा

New Gas Connection: महिनाभरात 11 हजार नव्या 'गॅस जोडण्या', बेकायदा सिलिंडरला बसला चाप

Maratha History: रायगड ते जिंजी: छत्रपती शिवरायांनी कशी उभारली स्वराज्याची दक्षिण फळी?

SCROLL FOR NEXT