Congress Dainik Gomantak
गोवा

मच्छीमारांचे हित जपण्यासाठी काँग्रेसने टाकले गळ!

या कार्यक्रमादरम्यान कॅसिनोचे सांडपाणी आणि प्लास्टिक कचऱ्याने प्रदूषित होत असलेल्या मांडवी नदीची काळजी न घेतल्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस (Goa Pradesh Congress) समितीने सत्तेत आल्यावर मच्छिमार समाजाच्या हिताचे रक्षण आणि किनारी पट्ट्यातील घरे आणि व्यवसाय वाचवण्याचे आश्वासन दिले आहे.

गोवा प्रदेश युवक काँग्रेसने (Congress) रविवारी मांडवी नदीकाठी जुन्या सचिवालयासमोर मासे पकडण्याचे स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महिलांसह सुमारे 200 जणांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमादरम्यान कॅसिनोचे सांडपाणी आणि प्लास्टिक कचऱ्याने प्रदूषित होत असलेल्या मांडवी नदीची काळजी न घेतल्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली.

यावेळी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar), युवक काँग्रेस अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर, माजी महापौर उदय मडकईकर, टोनी रॉड्रिग्ज, काँग्रेस मच्छीमार समितीचे अध्यक्ष वसंत गोपी नाईक, दया कारापूरकर, नागेश करिशेट्टी, जनार्दन भंडारी, अर्चित नाईक, साईश आरोसकर, व्यास प्रभू चोडणेकर, यश कोचरेकर, ओलेन्सीओ सिमोयस, विवेक डिसिल्वा, रोशन चोडणकर, निकिता वायंगडे, हिमांशू तिवरेकर, संकेत भंडारी, पीटर फेर्नांडीस, मॅक्रोनेल फेर्रांव, सौरव भगत, रियाज सय्यद आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चोडणकर म्हणाले की, भाजप सरकारने राजकीय फायद्यासाठी कर्नाटकसोबत म्हादई नदीची तडजोड केली त्यामुळे मांडवी नदीचे खारटपाण्याचे संतुलन बिघडले आहे. "पूर्वी म्हादईचे गोडपाणी मांडवी नदीच्या क्षारतेचा समतोल साधत होते, परंतु वळवल्यानंतर ते विस्कळीत झाले आहे." असे चोडणकर म्हणाले.

मांडवी नदीतील प्रदूषणावर लक्ष ठेवण्यातही भाजप सरकार अपयशी ठरले आहे, असे ते म्हणाले. “या स्पर्धेदरम्यान माशांऐवजी प्लास्टिक पकडण्यात आले. यावरून आम्हाला सूचित होते की ही नदी स्वच्छ करण्याची आणि पुढे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे.” असे चोडणकर म्हणाले.

अ‍ॅड. म्हार्दोळकर म्हणाले की, काँग्रेसची सत्ता आल्यावर किनारपट्टी भागातील सर्व मच्छिमारांचे हित जपले जाईल. "या सरकारने आमच्या पारंपारिक मच्छिमारांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष केले आहे." असे म्हार्दोळकर म्हणाले.

उदय मडकईकर म्हणाले की, मांडवी नदीकाठी असलेल्या कॅसिनोच्या जेटींमुळे लोकांना येथे मासे पकडण्याची संधी मिळत नाही. “आम्ही या जेटींमुळे येथे दररोज वाहतुक कोंडी पाहतो. पण सत्तेत आल्यावर आम्ही सर्व समस्या दूर करणार.” असे ते म्हणाले.

ओलेन्सिओ सिमोयस म्हणाले की नवीन बंदर कायद्याने एमपीटीला स्वायत्त संस्था बनवले आहे आणि काही अधिकार दिले आहेत. "एमपीटी ही सर्व किनारी ठिकाणे भाडेतत्त्वावर देऊ शकते, ज्यामुळे गोमंतकियांना व्यवसाय करण्यापासून वंचित राहावे लागेल." असे ते म्हणाले.

मच्छीमारांचे हित जपले जाईल, असेही ते म्हणाले. “आम्ही या सरकारला किनारी भागातील आमची घरे पाडू देणार नाही. आम्ही त्यांचे रक्षण करू.” असे ते म्हणाले.

हितेश धुरी याने प्रथम पारितोषिक पटकावले, तर एडसन फर्नांडिस आणि वेलेंटाइन रॉड्रिग्स यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच शंकर मिस्त्री याला फर्स्ट कॅच प्रकारात, रॉबर्ट डिसूझा याला मॅक्झिमम कॅच आणि दीपराज नाईक याला सर्वात लहान कॅच प्रकारात बक्षीस मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT