Girish Chodankar vs Rohan Khaunte
Girish Chodankar vs Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Politics : ‘साल्‍वादोर द मुंद’ प्रकरणात गिरीश-रोहन आमने-सामने

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Politics : बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने जमीन हडप केल्याचे प्रकरणाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या विशेष तपास पथकाचा तपास (एसआयटी) सध्या विशेष चर्चेत आहे. राज्यभर पसरलेल्या या प्रकरणांमधून तपास सुरू आहे. यामध्ये राजकीय व्यक्तींचीही नावे पुढे आल्याची माहिती असून काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यावर तोफ डागल्याने आता दोघे आमने-सामने आलेत.

जमीन हडप प्रकरणांमध्ये अद्याप कोणत्याही राजकीय व्यक्तीकडे अंगुलीनिर्देश झाला नसला तरी यात काही नेत्यांचा हात असल्याची माहिती आहे. अशातच काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एका मंत्र्याचा पर्वरी आणि साल्वादोर द मुंद येथील प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला. या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी अन्यथा आपण त्याचे नाव जाहीर करू असे आव्हान दिले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी आपला कोणतचा मंत्री अशा प्रकरणांमध्ये सहभागी नसल्याची ग्वाही दिली होती.

प्रकरणाचे काय होणार?

मंत्री खंवटे यांनी चोडणकर यांना ‘त्यांच्याच काँग्रेस पक्षाने दलाल म्हटल्याचे’ सांगत टीकास्त्र सोडले आहे. यावर चोडणकर यांनी ‘आपण अद्यापही कोणाचे नाव घेतले नसताना खंवटे एवढे त्रस्त का?’ असा पलटवार केला. त्यातच आता हे प्रकरण एसआयटी की सीबीआयकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.

खंवटेंच्या मागणीचे चोडणकरांकडून स्वागत

ज्यांच्या पक्षातून ज्यांना दलाल असे संबोधले जाते, अशी काही माणसे माझ्यावर टीका करत आहेत. कोणी काहीही म्हणो, साल्वादोर द मुंद येथील तथाकथित जमीन हडप प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असे माझे मत आहे, असं रोहन खंवटे यांनी म्हटलं आहे. तर मंत्री रोहन खंवटे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनी बळकवण्याच्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याचे मी स्वागत करतो. त्यात सेरूला कोमुनिदाद जमिनीचा समावेश आहे का?, हे स्पष्ट करावे, असा पलटवार गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT