GCA Cricket Tournament Dainik GOmantak
गोवा

धडाकेबाज विजयासह जीनो उपांत्य फेरीत

प्रीमियर लीग क्रिकेट : आघाडीच्या बळावर करिमाबाद क्लबचीही कूच

दैनिक गोमन्तक

पणजी : धडाकेबाज खेळ केलेल्या जीनो स्पोर्टस क्लबने बुधवारी जीसीए प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला आणि उपांत्य फेरीत जागा मिळविली. सांगे येथील जीसीए मैदानावर त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळी धेंपो क्रिकेट क्लबला आठ विकेट्स राखून हरविले. (Gino in semi-final of GCA Cricket Tournament )

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर करिमाबाद क्रिकेट क्लब व साळगावकर क्रिकेट क्लब यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. करिमाबाद क्लबने पहिल्या डावात 142 धावांची आघाडी घेतली होती. त्या बळावर त्यांना तीन गुण मिळाले. पहिल्या लढतीत त्यांनी एमसीसी संघाला डावाने हरविले होते. त्यामुळे त्यांचे 10 गुण झाले.

जीनो क्लबविरुद्ध पहिल्या डावात 112 धावांच्या पिछाडीनंतर धेंपो क्लबचा दुसरा डाव कालच्याच 176 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर जीनो क्लबला विजयासाठी 65 धावांचे आव्हान मिळाले. त्यांनी दोन विकेटच्या मोबदल्यात लक्ष्य 21.4 षटकांत गाठले. जीनो क्लबने पहिल्या सामन्यात चौगुले क्लबवर पाच विकेट्स राखून मात केली होती. त्यामुळे त्यांचे दोन लढतीनंतर 12 गुण झाले व उपांत्य फेरी निश्चित झाली.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव : 127 व दुसरा डाव : 176 पराभूत वि. जीनो स्पोर्टस क्लब, पहिला डाव :239 व दुसरा डाव :21.4 षटकांत 2 बाद 67 (शिवम आमोणकर नाबाद 20, गौरीश कांबळी नाबाद 21, विकास सिंग 1-25 , मलिक सिरूर 1- 12 )

करिमाबाद क्रिकेट क्लब, पहिला डाव :245 व दुसरा डाव (1 बाद 26 वरून) :66 षटकांत 9 बाद 209 (आलम खान 39, कश्यप बखले 20, तुनीष सावकार 11, दीपराज गावकर 16, राजशेखर हरिकांत 69, सोहम पानवलकर 18 , शुभम तारी 3-34 , समित आर्यन मिश्रा 2-74, धीरज यादव 3-66).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT