Gavandali Old Goa Railway Bridge Work Dainik Gomantak
गोवा

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

Gavandali Old Goa Railway Bridge Work: उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंदचा आदेश देऊनही कामाला सुरवात झाली नव्हती. अखेर जूनमध्ये कामाला सुरुवात झाली; पण दोन-तीन महिने उशिरा.

Sameer Panditrao

खांडोळा: गवंडाळी-जुने गोवे मार्गावर सध्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू असून या कामाला अद्याप गती मिळालेली नाही. ते संथ गतीने चालले आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो. या काळात विनाअडथळा काम गतीने होणे अपेक्षित असूनही कामात प्रगती दिसत नाही. हे काम गतीने करावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.

या ठिकाणी दिवसभर केलेल्या कामामुळे रस्त्यावर माती, खडी पडलेली असते. त्यामुळे रात्री वाहनचालकांना वाहन चालवताना अडथळा निर्माण होत आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंदचा आदेश देऊनही कामाला सुरवात झाली नव्हती. अखेर जूनमध्ये कामाला सुरुवात झाली; पण दोन-तीन महिने उशिरा.

जुने गोवेच्या बाजूने गतीने कामाला सुरवात झाली. चार ते सहा कॉलमसाठी खोदाई करण्यात आली. तेथे काँक्रिटही घालण्यात आले. काही कॉलम उभे राहिले, पण गवंडाळीच्या बाजूने मात्र कामाला उशिरा सुरवात केली. त्या बाजूला फक्त पत्रेच मारण्यात आले.

त्यामुळे रस्ता अरुंद झाला. शिवाय बाजूला पाणी साचत आहे, तेथे दिवाबत्तीची सोय नाही. त्यामुळे संध्याकाळी पाचनंतर या मार्गावरून वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आमदारांनी लक्ष द्यावे!

कुंभारजुवेचे फळदेसाई यांनी या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी गवंडाळी-जुने गोवे रस्ता सकाळी १० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ नंतर खुला ठेवण्यासंदर्भात संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढला. सध्या बाजूची माती, खडी रस्त्यावर येत असल्यामुळे संध्याकाळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. आमदारांनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Floods: नेपाळच्या महापुरातून 21 भारतीयांची सुखरुप सुटका, परराष्ट्र मंत्रालयाकडून यादी जाहीर; रेस्क्यू ऑपरेशन सुरु

RGP Goa: काँग्रेससोबत आघाडीसाठी 'आरजी'ची तयारी! अमोल नावेलकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती; 30 दिवसांत चर्चा पूर्ण करण्याची मागणी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळाच्या जागतिक क्रमवारीला मोठा धक्का! 3 महिन्यांत 12 स्थानांची घसरण; प्रवासी समाधानाचा गुणांकही 4.94 वरून 4.89 वर

FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Nepal Floods: नेपाळमध्ये महापुराचा कहर! 288 भारतीय बेपत्ता, परराष्ट्र मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; मदतीसाठी कंट्रोल रुम-हेल्पलाइन सुरु

SCROLL FOR NEXT