Solapur Road Accident  Dainik Gomantak
गोवा

Solapur Accident: क्षणभर विश्रांती ठरली अखेरची; वारकरी महिलेचा अपघाती मृत्यू

Solapur Accident: रेवोडातील वारकरी महिलेचा सोलापूर मार्गावर अपघाती मृत्यू, अन्य दोघे वारकरी जखमी; चालकास अटक

गोमन्तक डिजिटल टीम

आषाढी एकादशीनिमित्त अस्नोड्यामधून पायी वारीतून पंढपूरला गेलेल्या रेवोडा येथील ६५ वर्षीय गौरी कुडतरकर यांचा सोलापूर मार्गावर अपघातात करुण अंत झाला. चालून पाय दुखू लागल्याने क्षणभर विश्रांतीसाठी बसलेल्या वाहनावरच पाठीमागून ‘कार’रूपी काळाने घाला घातला.

या अपघातास कारणीभूत ठरलेला चालक अर्शिद पारिड्डा याला अटक केली आहे. या अपघाताची बातमी समजताच कुटुंबीयांनी अपघातस्थळी धाव घेतली. गौरी कुडतरकर या अस्नोडा ते पंढरपूर पायी वारीसाठी बुधवार, ३ जुलैला इतर वारकऱ्यांसोबत निघाल्या होत्या. मात्र, ही वारी त्यांच्यासाठी अखेरची ठरली. शुक्रवारी (ता.१२ जुलै) सकाळी १०.३०च्या सुमारास सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात घडला.

गौरी कुडतरकर या सहकारी सुरेखा शिरोडकर यांच्यासह गाडीत विश्रांतीसाठी बसल्या. ही गाडी रस्त्याशेजारीच उभी केली होती. चालक साबाजी गाड हेही गाडीत होते. त्यावेळीच दुसऱ्या भरधाव कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात गौरी यांचा मृत्यू झाला, तर सुरेखा आणि साबाजी हे जखमी झाले.

विठ्ठल दर्शनापूर्वीच वारी ठरली अखेरची

गौरी कुडतरकर यांनी गेल्या वर्षीही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पायी वारी केली होती. यंदाची त्यांची दुसरी वारी अखेरची ठरली. ७० जणांचे वारकरी मंडळ अस्नोड्याहून पायी दिंडीत सहभागी झाले होते. मात्र, विठूरायाचे दर्शन घेण्यापूर्वीच कुडतरकर यांचे आकस्मिक जाणे सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेले.

गोव्यात होणार अंत्यसंस्कार

कुडतरकर या विठ्ठलाच्या भक्त असून, घरी हरिपाठ उपासना करायच्या. यंदाचे हे वारीचे दुसरे वर्ष होते. सामाजिक कार्यात त्या सक्रिय असायच्या. पतीचे निधन झाले असून, त्यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. गौरी यांच्या पार्थिवावर गोव्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT