Gauri Achari Murder Case Dainik Gomantak
गोवा

Gauri Achari Murder Case: प्राध्यापिकेची हत्या करणाऱ्या फिटनेस ट्रेनरला दणका, तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला

Gauri Achari Murder Case: सुनावणीला विलंब होत आहे आणि या प्रकरणात त्याला चुकीच्या पद्धतीने गोवल्याचे सांगत त्याने तिसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला होता.

Pramod Yadav

Gauri Achari Murder Case

पणजी: प्राध्यापिका गौरी आचारी खून प्रकरणातील संशयित आरोपी फिटनेस ट्रेनर गौरव बिद्रेचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. सुनावणीला होत असलेला विलंब जामीन देण्याचे कारण ठरु शकत नाही, असे पणजी कोर्टाने म्हटले आहे. तसेच, या प्रकरणात पुरावे गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे कोर्टाने म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालच्या सूचनेप्रमाणे सत्र न्यायालयाला सुनावणीच्या तारखा ठरवण्यास सांगितले आहे. तसेच, गौरी आचारी खून प्रकरण, तपास अधिकाऱ्याला देखील सुनावणी दरम्यान हजर राहण्याची सूचना करण्यात आलीय. बिद्रेने यापूर्वी दोनवेळा दाखल केलेला जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला होता. दरम्यान, सुनावणीला विलंब होत आहे आणि या प्रकरणात त्याला चुकीच्या पद्धतीने गोवल्याचे सांगत त्याने तिसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला होता.

कोर्टाने बिद्रेचा जामीन अर्ज फेटाळताना सुनावणीला त्याच्यामुळेच विलंब झाल्याचे नमूद केले. बिद्रेने वारंवार अर्ज दाखल केल्याचा हवाला यावेळी कोर्टाने दिला. प्राध्यापिका डॉ. गौरी आचारी 23 जून 2022 रोजी बेपत्ता झाली होती. त्यानंतर कदंब पठारावर तिचा मृतदेह कारमध्ये आढळून आला होता. पोलिसांनी फिटनेस ट्रेनर गौरव बिद्रेला ताब्यात घेऊन चौकशी केली. ओळख परेडमध्ये बिद्रेचा अहवाल सकारात्मक आला होता.

गौरव बिद्रेची अनेक महिलेशी मैत्री होती, असे पोलिस तपासात समोर आले होते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये बिद्रेविरोधात पोलिसांनी तीस पानाचे अतिरिक्त आरोपपत्र दाखल केले होते. यात नव्याने आठ साक्षीदारांचा उल्लेख करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT