Goa Police Crime News: Daiinik Gomantak
गोवा

Goa Crime News: गौरवच्या अंगावर नखांचे ओरखडे नेमके कोणाचे

Goa Crime News: दीक्षाचे वडील गोव्यात : प्राण वाचविण्यासाठी ‘तिने’ केली धडपड

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: काब द राम येथील समुद्रात ज्यावेळी गौरव पत्नी दीक्षा हिला बुडविण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी तिने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपड केली होती, हे फॉरेन्सिक तपासणीत उघड झाले आहे. गौरवच्या शरीराची फॉरेन्सिक पथकाने शनिवारी रात्री तपासणी केली असता, त्याच्या छातीवर महिलेच्या नखांचे ओरखडे दिसून आले.

स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करतानाच दीक्षाने पतीच्या बरीच धडपड केली असावी, असा तर्क पुढे आला आहे. आज दीक्षाचे वडील आणि चुलतभाऊ गोव्यात पोहोचले असून सोमवारी त्यांच्या उपस्थितीत तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली जाणार आहे.

मूळ लखनऊ येथील; पण सध्या कोलवा येथे एका तारांकित हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा गौरव कटियार याने शनिवारी पत्नी दीक्षा गंगवार हिला समुद्राच्या पाण्यात बुडवून ठार केले होते. आपले विवाहबाह्य संबंध पत्नीला कळल्यामुळे त्याने तिचा काटा काढल्याचे सांगितले जाते.

गौरवच्या वक्तव्यात तफावत आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

अनाहुतपणे ‘ती’ घटना कॅमेऱ्यात कैद

ही घटना घडली, त्याचवेळी त्या समुद्र किनाऱ्यावर सहलीसाठी आलेल्या एका व्यक्तीने सहज व्हिडिओ शूटिंग सुरू केल्याने हा प्रकार उघडकीस आला. या व्हिडिओत गौरव पत्नीला घेऊन खडकाळ जागेकडे जात असल्याचे दिसून येते. पण माघारी येताना तो एकटाच येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर लगेच दीक्षाचा मृतदेह किनाऱ्यावर वाहून आल्याचेही या व्हिडिओत दिसते. या व्हिडिओमुळेच गौरवचे कुकर्म उघड झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT