Gaur Attack  Dainik Gomantak
गोवा

अडवलपाल येथे गव्याचा संचार

डिचोली तालुक्यातील अडवलपाल गावात लोकवस्तीजवळच एका गव्याचा संचार वाढला आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली : डिचोली तालुक्यातील अडवलपाल गावात लोकवस्तीजवळच एका गव्याचा संचार वाढला आहे. लोकवस्तीजवळच हा गवा फिरत असल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. हा गवा धावत्या वाहनांचा पाठलाग करत असून, दोनच दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वार सुदैवाने त्याच्या तावडीतून सुटला,अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली.

या गव्याचा उपद्रव वाढण्यापूर्वीच वन खात्याने या गव्याचा बंदोबस्त करावा. अशी मागणी होत आहे. रात्री-अपरात्री हा गवा रस्त्यावर संचार करीत असताना अनेकांच्या नजरेला पडला आहे. दोन दिवसांपूर्वी एक दुचाकीस्वार अडवलपाल रस्त्याने जात असता, या गव्याने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने दुचाकीस्वार त्यातून बचावला.

काल (बुधवारी) रात्री पडलेल्या पावसावेळी हा गवा गावात शिरला होता, तर आज (गुरुवारी) सकाळी गवा गावातील कालव्याजवळ मुख्य रस्त्यावर हिंडत होता. गव्याच्या संचारामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावरुन एकट्या दुकट्याने प्रवास करणे धोक्याचे बनले असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गव्यांची संख्या आता वाढली आहे. गवे लोकवस्त्यांजवळ येण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे घाट वा डोंगराळ परिसरात त्यांना खाद्य मिळणे दुरापास्त झाले आहे. खाद्य शोधार्थ गव्यांनी मोर्चा लोकवस्तीकडे वळवला आहे. अलीकडे बहुतेक भागात गव्यांचे अस्तित्व जाणवत आहे.

-अमृत सिंग, प्राणिमित्र.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT