Gas will be available in Vasco at 40 per cent discount Dainik Gomantak
गोवा

'...त्यामुळे 40 टक्के कमी दरात गॅस उपलब्ध होणार'

या सुविधेमुळे लोकांचा त्रास होणार कमी

दैनिक गोमन्तक

वास्को : इंडियन ऑइल अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेडने वास्कोचे आमदार कृष्णा दाजी साळकर यांच्या उपस्थितीत पाइपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठ्याच्या कामाचे उद्घाटन केले. याप्रसंगी कदंब महामंडळाचे चेअरमन दीपक नाईक, नगरसेविका शमी साळकर, नगरसेवक गिरीश बोरकर, इंडियन ऑइल अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेडचे प्रकल्प व्यवस्थापक सचिन पठारे व इतर अधिकारी उपस्थित होते.

येथील हॉटेल रुक्मिणी जवळ सदर कामाचा शुभारंभ वास्कोचे आमदार (MLA) कृष्णा साळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार साळकर म्हणाले की वास्को वासियांना पाइपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा होणार याचा मला आनंद होत आहे. कारण या सुविधेमुळे लोकांचा त्रास कमी होणार आहे.

गॅस (gas) बुक करून सिलेंडर घरपोच होईपर्यंत वाट बघत राहणे, अचानक सिलेंडर संपला तर होणारी धावपळ कमी होणार. तसेच गॅसचा दर बघितला तर 40 टक्के कमी दरात गॅस उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. प्रकल्प व्यवस्थापक सचिन पठारे यांनी गॅस पाईपलाईनद्वारे गॅस सप्लाय सुरक्षित आहे. ईकनॉमिकल तसेच 24×7 याचा सप्लाय होणार आहे. झुआरीनगरमध्ये सीएनजी, कुठ्ठाळी, बिर्लामध्ये चालू झाल्याचे ते म्हणाले. लोकांना बऱ्यापैकी सर्विस देण्याचा आमचा प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asim Munir: पाकचे सैन्य प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा ओकली गरळ; भारताला दिली अणुयुद्धाची धमकी Watch Video

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

चौकार-षटकारांचा पाऊस, 'पॉवर हिटर' किरण नवगिरेनं रचला इतिहास; टी-20 मध्ये झळकावलं सर्वात जलद शतक

Diwali Market: 200 वर्षांची परंपरा धोक्यात! 'भायले' व्यापारी आल्याने गोमंतकीय दुकानदारांचा व्यवसाय थंड

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT