LPG Gas Cylinder Dainik Gomantak
गोवा

LPG Gas Cylinder: गॅस एजन्सींवर करडी नजर! काळाबाजार रोखण्यासाठी 53 कर्मचाऱ्यांची नियुक्ती; 25 दिवसांनीच होणार बुकिंग

LPG Gas Cylinder Goa: अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे, की कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही एजन्सी किंवा व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यातील घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि काळाबाजार रोखला जावा, यासाठी ५३ कर्मचाऱ्यांना गॅस एजन्सीच्या ठिकाणी तैनात केल्याची माहिती नागरी पुरवठा संचालक जयंत तारी यांनी दिली.

खाते राज्यभरातील गॅस पुरवठा स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले. गॅस पुरवठ्याची सद्यस्थिती लक्षात घेता आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याने राज्यातील विविध एलपीजी गॅस एजन्सींमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करून कडक देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ लागू केल्यानंतर घेण्यात आला असून, साठेबाजी, काळाबाजार रोखणे आणि ग्राहकांना अत्यावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करणे, हा त्यामागील उद्देश आहे.विभागातील अधिकाऱ्यांना राज्यातील गॅस एजन्सींमध्ये तैनात केले असून ते एलपीजी सिलिंडरच्या वितरणावर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत.

त्यामुळे संपूर्ण राज्यात पुरवठा साखळी सुरळीत राहील, याची खात्री केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे, की कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही एजन्सी किंवा व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांमध्ये घबराट निर्माण होऊ नये आणि अत्यावश्यक वस्तूंचे व्यवस्थित वितरण व्हावे, या उद्देशाने ही खबरदारीची उपाययोजना केल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

‘ओटीपी’नंतर मिळणार सिलिंडर

एलपीजी सिलिंडरचे वितरण एकदाच वापरता येणारा ओटीपी दाखवल्यानंतरच करण्यात येणार असल्याचे नागरी पुरवठा खात्याने स्पष्ट केले आहे. एलपीजीचे योग्य आणि न्याय्य वितरण सुनिश्चित करण्यासाठी सर्व ग्राहकांनी या सूचनांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

२५ दिवसांनंतरच बुकिंग

राज्य सरकारच्या नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याने घरगुती गॅस ग्राहकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. खात्याच्या पत्रकानुसार, सध्या एलपीजी सिलिंडरचे बुकिंग मागील सिलिंडरच्या वितरणानंतर किमान २५ दिवसांनीच करता येणार आहे.

ऑनलाईन बुकिंगचे आवाहन: ग्राहकांना पुरेसा पुरवठा सुनिश्चित केल्याचेही खात्याने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी सिलिंडरचे बुकिंग व्हॉट्स ॲप, मिस्ड कॉल, मोबाईल ॲप किंवा संकेतस्थळाद्वारे करावे.

घरपोच वितरणाचा लाभ घ्या:अनावश्यक सिलिंडर बुकिंग टाळावे तसेच गॅस एजन्सीकडे जाण्याऐवजी घरपोच वितरणाचा लाभ घ्यावा. ग्राहकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: नशिबाची तगडी लॉटरी, गरिबी कायमची मिटणार! 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं भाग्य; बुध-मंगळाचा मोठा चमत्कार

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

SCROLL FOR NEXT