Morjim Garden | Rohan Khaunte | Jeet Arolkar Dainik Gomantak
गोवा

Morjim News: मोरजीतील उद्यान होणार खुले; 31 ऑक्टोबरपर्यंत कामे पूर्ण करण्याच्या मंत्री खंवटेच्या सूचना

Morjim Garden: मोरजी उद्यान दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आल्याने पर्यटक तसेच मुलांची गैरसोय होते. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आमदार जीत आरोलकर यांच्या समवेत गुरुवारी या उद्यानाला भेट दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Rohan Khaunte, Jeet Arolkar Visits Morjim Garden

मोरजी: साडेसात कोटी पेक्षा जास्त खर्च करून स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत पर्यटन खात्यामार्फत उभारलेले उद्यान दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आल्याने पर्यटक तसेच मुलांची गैरसोय होते. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आमदार जीत आरोलकर यांच्या समवेत गुरुवारी या उद्यानाला भेट दिली.

यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, मोरजीचे सरपंच पवन मोरजे, पंच फटू शेटगावकर, आनंद शेटगावकर, समीर वाडजी, स्नेहा तिळोजी, प्राची भिवशेट आदी उपस्थित होते.

मंत्री खंवटे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना विविध सूचना करताना उद्यानांची योग्य देखभाल केली जावी. तसेच दुरुस्तीचे कामही वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष देण्यास सांगितले. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे उद्यान पूर्णपणे खुले होईल. असे खंवटे यांनी यावेळी सांगितले.

आमदार, सरपंचाकडून स्वागत

आमदार जीत आरोलकर यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत उद्यान खुले होणार या मंत्री खंवटे यांच्या घोषणेचे स्वागत केले. सरपंच पवन मोरजे यांनी किनारी भागातील समस्यांकडे लक्ष वेधले. तसेच तेमवाडा येथे पार्किंग व्यवस्था व स्टॉलधारकांना पक्के स्टॉल उभारण्याची योजने स्वागत केले.

तेमवाडा येथे पार्किंग व्यवस्था, पक्के स्टॉल

मंत्री खंवटे यांनी यावेळी तेमवाडा, मोरजी येथील किनारी भागात पार्किंग व्यवस्था करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. तसेच या परिसरातील स्थानिक स्टॉलधारकांना पक्के स्टॉल उभारून देण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबत आमदार आरोलकर तसेच पंचायत मंडळास व्यावसायिकांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच किनारी भागात चेंजिंग रूम आदी सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असेही खंवटे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT