Karapur Dainik Gomantak
गोवा

Karapur News : कारापुरात कचरा समस्या गंभीर ; दुर्गंधीत वाढ

Karapur News : आठ दिवसांपासून पंचायत घराजवळ कचरा ‘डंप’

गोमन्तक डिजिटल टीम

Karapur News :

कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात पुन्हा कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले असतानाच, चक्क पंचायतीकडूनच भर लोकवस्तीत कचरा ''डंप'' करण्याचा प्रकार घडत आहे. पूर्वाश्रमीच्या पंचायत इमारतीजवळ रस्त्याला टेकून पंचायतीने डंप केलेला कचरा गेल्या आठ दिवसांपासून पडून राहिल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

पंचायतीच्या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत असून ग्रामस्थ संतप्त बनल्यानंतर आज (रविवारी) हा कचरा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र गेल्या आठ दिवसांपासून जवळपासच्या लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला.

कारापूर पंचायतघर इमारत कमकुवत झाल्याने नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच कचरा जमा करण्यासाठी बांधण्यात आलेली तात्पुरती शेडही मोडण्यात आलेली आहे. तेव्हापासून कचरा पूर्वाश्रमीच्या इमारतीजवळ रस्त्याच्या बाजूने कचरा ''डंप'' करण्यात येत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. डंप करण्यात आलेल्या कचऱ्यात ओला कचरा असल्याने गेल्या आठ दिवसांपासून मोठी समस्या निर्माण होताना कचरा कुजल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागल आहे, अशी कैफियत सुनील पोकळे आणि अन्य नागरिकांनी दिली.

वास्तविक पंचायतीकडून जमा करण्यात येणारा सुका कचरा लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेण्यात येत आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून रस्त्याच्या बाजूने कचरा तसाच पडून राहिला. मिळालेल्या माहितीनुसार हा कचरा तिस्क, विठ्ठलापूर परिसरातील असून, ओल्या कचऱ्यामुळे ही समस्या निर्माण झाली.

कचरा समस्या कायम

  • कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात अन्य भागातही कचरा समस्या कायम आहे. पंचायतीतर्फे घरोघरी कचऱ्याची उचल होत असली, तरी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार अजूनही चालूच आहेत. उघड्यावर आणि रस्त्याच्या बाजूने कचरा टाकणाऱ्या विरोधात पंचायतीने दंडात्मक कारवाई करावी.

  • अशी सामान्य जनतेची मागणी आहे. कारापूर-तिस्क, कुळण, गोकुळवाडा, न्यू वाडा, सर्वण आदी भागात कचऱ्याची समस्या आहे.

  • पंचायतीतर्फे साफसफाई केली, की काही दिवस परिसर स्वच्छ दिसून येतात. नंतर पुन्हा कचरा समस्या डोके वर काढते. हा कचरा कोठून येतोय आणि कोण टाकतोय त्याबद्दल गूढ निर्माण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

स्थानिक टॅक्सी युनियनची दादागिरी; बीच भागात येणाऱ्या टॅक्सी चालकांवर हल्ला, गाडीची तोडफोड, असोसिएशनकडून तक्रार

Goa Today's Live News: सांगेत बिरसा मुंडा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

गोकुळची ‘ती’ फुगडी स्पर्धा ठरली अखेरची! एकुलता एक मुलगा, अर्धांगवायू झालेला पती; कमावत्या महिलेचा Heart Attack ने मृत्यू

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT