गोवा वैद्यकीय महाविद्यालयासमोर (GMC) कचऱ्याच्या ढीगाऱ्यावर उभारण्यात आलेले गाढे हटवताना Dainik Gomantak
गोवा

GMC समोरील कचऱ्याच्या ढीगाऱ्यावर उभारण्यात आलेले गाढे हटवले

गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) बांबोळीच्या समोर बेकायदेशीरपणे कचऱ्याच्या (Garbage) ढिगाऱ्यावर उभारण्यात आलेले गाडे आज प्रशासनाने हटवले.

दैनिक गोमन्तक

पणजी : भारतातील मोजक्याच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Medical colleges) समावेश असलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) बांबोळीच्या समोर बेकायदेशीरपणे कचऱ्याच्या (Garbage) ढिगाऱ्यावर उभारण्यात आलेले गाडे आज प्रशासनाने हटवले. त्यामुळे राष्ट्रीय हमरस्ता बांधकामाला वाट मोकळी झालीस. त्याच बरोबर गोमेकॉसमोर (GMC) जे गलिच्छ चित्र दिसत होते व वाहतुकीला अडथळा ठरत होती. तो देखील नाहीसा झाला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत केलेले आहे.

मात्र काही राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते बेकायदेशीर गाडे हटवण्याच्या प्रकरणाचाही राजकीय फायदा उठवण्यासाठी या कारवाईला विरोध करतानाही दिसत आहेत. 2002 साली माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या परिसरात फक्त पाच गाडे दिन दयाळा रोजगार योजनेअंतर्गत येथील स्थानिकांना दिले होते. मात्र त्यानंतर हळूहळू येथे जवळ जवळ दोनशे गाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला, अडचणीच्या ठिकाणी उभे राहिले. स्थानिक लोकप्रतिनिधी व आमदार यांचे अभय लागल्यामुळे या गाड्यांची संख्या हळूहळू वाढतच गेली.

त्यामध्ये स्थानिकाबरोबरच परप्रांतीय नागरिकांनीही गाडे उभारले होते .अनेक वेळा या गाड्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले. मात्र लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेपामुळे ही कारवाई रहीत होत गेली.शेवटी आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील गाडे हटवण्यात आले आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. सरकारने या गाडे चालकांना इतरत्र पुनर्वसन करण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले आहे. त्यामुळे सरकारने त्वरीत आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी गाडे चालकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT