Garbage Management Workshop Dainik Gomantak
गोवा

Garbage Management Workshop : कचरा व्यवस्थापनावरील भिरोंडा येथील कार्यशाळेचा समारोप

Garbage Management Workshop : जनजागृतीच्या माध्यमातून स्वच्छतेवर भर द्या

गोमन्तक डिजिटल टीम

Garbage Management Workshop : वाळपई, भारतीय कृषी संसाधन केंद्र, जुने गोवेमार्फत भिरोंडा पंचायत क्षेत्रामध्ये कचरा व्यवस्थापन संदर्भात जनजागृती करण्यात आली. सुका व ओला कचरा यावर कशाप्रकारे प्रक्रिया करण्यात येत असते.

कचऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती कशा प्रकारचे निर्माण करण्यात येते. या संदर्भाची माहिती देण्यात आली. तसेच प्रात्यक्षिक दाखविण्यात आली.

कंपोस्ट खत कसे तयार करावे तसेच सेंद्रिय खताची निर्मिती कशाप्रकारे करण्यात यावी, या संदर्भात माहिती देण्यात आली. एकूण पंधरा दिवस हा कार्यक्रम पंचायत क्षेत्रामध्ये राबविण्यात आला.

पंचायत क्षेत्रातील विविध भागात साफसफाईची मोहीम राबवण्यात आली. तसेच साफसफाई दैनंदिन जीवनाच्या विकासासाठी कितपत महत्त्वाची आहे, या संदर्भाची माहिती वेगवेगळ्या जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली.

समारोपाच्या कार्यक्रमाला सरपंच उदयसिंग राणे यांची उपस्थिती होती. भारतीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. प्रवीण कुमार, अधिकारी राहुल कुलकर्णी, सिद्धार्थ मराठे यांची उपस्थिती होती.

सरपंच उदयसिंग राणे यांनी भारतीय कृषी संशोधन केंद्राने पंचायत क्षेत्रात हा उपक्रम राबविल्याबद्दल केंद्राच्या अधिकाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन राहुल कुलकर्णी यांनी केले. सिद्धार्थ मराठे यांनी आभार मानले.

जनजागृतीच्या माध्यमातून स्वच्छतेवर भर द्या

यावेळी प्रवीण कुमार यांनी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आज स्वच्छतेवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे हा उपक्रम फक्त कागदोपत्री शिल्लक न राहता प्रत्यक्षपणे स्वच्छतेवर भर दिल्यास त्याचे चांगले परिणाम येणाऱ्या काळात आपल्या पर्यावरण होऊ शकतात.

यामुळे जनजागृतीच्या माध्यमातून स्वच्छतेवर भर द्या. यातून आरोग्याच्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगितले.

कचऱ्यातून तयार होते घातक रसायन

विनोद उभरदंडे या अधिकाऱ्याने कचऱ्यातून अनेक प्रकारचे रसायन तयार होत असते. हे रसायन अनेक वेळा पर्यावरणासाठी अत्यंत घातक असते.

यामुळे ओला व सुका कचरा वेगळा करणे, त्याचप्रमाणे नको असलेल्या कचऱ्यातील वस्तू त्याचे मिश्रण होणार नाही याकडे विशेष लक्ष देणे हे काळाची गरज असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT