Margao Dainik Gomantak
गोवा

मडगावात अस्वच्छतेचे साम्राज्य; नागरिक व्यक्त करत आहेत रोष

परप्रांतीयांच्या बेशिस्त तांड्यांमुळे मडगावात सर्वत्र अस्वच्छता.

दैनिक गोमन्तक

Margao: मडगावातील कोकण रेल्वे (Railway) स्थानक तसेच कदंब बस स्थानक परिसरात परप्रांतीय भटक्या जमातीच्या लोकांनी तांडे ठोकले आहेत. या परिसरात ते उघड्यावरच जेवण (Food) बनवितात. इतकेच नव्हे, तर मल-मूत्र विसर्जनही येथेच करत असल्याने हा परिसर गलिच्छ झाला आहे.

या प्रकारामुळे सभोवतालच्या परिसरात दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे सरकारच्या (Government) ‘स्वच्छ गोवा सुंदर गोवा’ या घोषवाक्याला हरताळ फासला गेला असल्याचे दिसून येते. यावर अंकुश ठेवण्यात प्रशासन का अपुरे पडते, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

गोवा राज्य हे देश-विदेशात उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून परिचित आहे. येथील किनारे, मंदिरे, चर्च पर्यटकांचे (Tourist) खास आकर्षण आहे. गोव्यात दाखल होणारे बहुतांश पर्यटक रेल्वे, बसने येतात. त्यामुळे बस स्थानक व रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ ठेवणे स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, याठिकाणी देखरेख ठेवण्यात स्थानिक प्रशासन अपुरे पडत असल्याचे दिसून येते.

कदंब बस स्थानक या परिसरातही या लोकांचा वावर असतो. स्थानिक प्रशासनाने याची दाखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांना याबाबत विचारले असता कोकण रेल्वे परिसरात या भटक्या जमातीच्या लोकांकडून असले प्रकार होत असल्याचे त्यांनी मान्य केले. कोकण रेल्वे स्टेशनवर सतत पर्यटकांची ये-जा असते. या लोकांना येथे पाहिल्यावर गोव्यात येणाऱ्या इतर पर्यटकांपर्यंत चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे. कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक त्यांच्यावर कारवाई करून त्यांना हाकलून लावते. तरी ते रात्रीच्या वेळी पुन्हा येतात. अशीच कारवाई कोकण रेल्वे पोलीसही करतात, असे ते म्हणाले.

उघड्यावर स्वयंपाक : खुल्या जागेतच मल-मूत्र विसर्जन

परप्रांतीयांच्या बेशिस्त तांड्यांमुळे मडगावात अस्वच्छतेचा कहर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

Salaulim Dam: साळावली धरण अखेर 'ओव्‍हरफ्‍लो', यंदा तब्‍बल 35 दिवसांचा विलंब; पर्यटकांसाठी निसर्गाचा आकर्षक नजराणा

SCROLL FOR NEXT