Garbage collection on the banks of the Valvanti River Dainik Gomantak
गोवा

World Environment Day 2023 : वाळवंटी नदीच्‍या किनारी केला 42 पोती कचरा गोळा; केरीत स्‍वच्‍छता

विवेकानंद पर्यावरण जागृती फौज, जैवविविधता समितीचा पुढाकार

दैनिक गोमन्तक डिजिटल

केरी-सत्तरीतून वाहणाऱ्या वाळवंटी नदीच्या स्वच्छता अभियानाला आज सुरूवात झाली. आज पहिल्‍या दिवशी झालेल्या पेळावदा-रावण येथील ‘उभो गुणो’ या वाळवंटीच्‍या तीरावरील प्लास्टिक, दारूचे रिक्त कॅन-बाटल्या आणि इतर मिळून सुमारे 42 पोती कचरा गोळा करण्‍यात आला.

विवेकानंद पर्यावरण जागृती फौज व केरीतील जैवविविधता व्यवस्थापन समितीतर्फे आयोजित केलेल्या या मोहिमेत स्थानिक परिसरातील शाळकरी मुलांनी सहभागी होत नदी किनारी पसरलेला कचरा गोळा केला.

या स्‍वच्‍छता मोहिमेला केरी ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले. यावेळी सरपंच दीक्षा गावस, स्थानिक पंच संदीप ताटे व पंचसदस्य उस्मान सय्यद यांनी भेट दिली. दीक्षा गावस यांनी सांगितले की, या स्वच्छता मोहिमेची संकल्पना खूपच चांगली आहे.

अभियान सुरूच राहणार : विठ्ठल शेळके

वाळवंटी किनारी असलेला कचरा पावसाच्या पाण्यात नदीतून वाहत जाऊन समुदात जातो. त्‍यामुळे समुद्राचा परिसर प्रदूषित होतो. जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने यावर्षी प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याची संकल्पना आहे. त्यानुसार यंदा आम्ही ही मोहीम आरंभली आहे.

काल सोनाळ-सत्तरी येथील ‘म्होवाचो गुणो’ आणि आज वाळवंटीतील ‘उभो गुणो’ हे उन्हाळ्‍यात आंघोळीसाठी येणाऱ्या तरूणाईकडून प्रदूषित आणि कचरामय केलेले परिसर स्वच्छ केले. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे, असे विवेकानंद पर्यावरण जागृती फौजचे समन्वयक विठ्ठल शेळके यांनी सांगितले.

"केरी पंचायत क्षेत्राचा परिसर स्वच्छ ठेवणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे या उद्देशाने आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे. त्यास विवेकानंद पर्यावरण जागृती फौज आणि स्थानिक मुलांनी चांगले सहकार्य केले."

नंदा माजिक, जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT