Ganjem Temple Theft:  Dainik Gomantak
गोवा

Ganjem Temple Theft: गांजे येथील गांजेश्वरी, शांतादुर्गा मंदिरात चोरी; फंडपेटी फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास

पोलिस घटनास्थळी दाखल

Akshay Nirmale

Ganjem Temple Theft News: गोव्याच्या फोंडा तालुक्यातील गांजे येथील गांजेश्वरी आणि शांतादुर्गा मंदिरात चोरी झाली आहे. या मंदिरांमधील फंडपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड ते दोन लाखाचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने मंदिरात धाव घेतली.

सध्या पोलिसांनी चोरट्यांचा माग काढायला सुरवात केली आहे. त्यादृष्टीने पोलिस देवस्थानच्या विविध पदाधिकाऱ्यांसह आजूबाजूला चौकशी करत आहेत. या चोरीमध्ये फंडपेटीतील रोकड तसेच मंदिरातील समई चोरून नेल्या आहेत. एकूण मुद्देमाल दीड ते दोन लाख रूपयांचा असल्याचे सांगितले जात आहे.

देवस्थानचे मंदीर हा ग्रामस्थांचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने यातील दोषींना माग काढून तातडीने अटक करावी, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hospital Infrastructure: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून 'आप' आक्रमक; आरोग्य सुविधा सुधारण्याची मागणी

Government Schemes: 'सरकार तुमच्या दारी'ला गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच दिवशी 5,960 नागरिकांचा सहभाग

Crime News: लग्नाचे प्रलोभन दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप; पॉक्सो न्यायालयाकडून आरोपीवर आरोप निश्चित

CCP Election Case: सीसीपी निवडणूक वादात अधिकारक्षेत्राचा मुद्दा; जिल्हा न्यायालयाला नियम रद्द करता येत नसल्याचा दावा

Fake Voters Allegations: फातोर्ड्यात 50 हून अधिक बोगस मतदार? सरदेसाईंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT