Goa Police Crime News: Daiinik Gomantak
गोवा

Goa Crime News: कुळेत घृणास्पद प्रकार ; कामाच्या शोधात आलेल्या दोन मुलींवर सामूहिक बलात्कार

Goa Crime News: : छत्तीसगडच्या तिघांना अटक

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: कामाच्या शोधात गोव्यात आलेल्या मध्य प्रदेश येथील दोन अल्पवयीन मुली तीन वासनांध युवकांच्या शिकार बनल्या. याप्रकरणी पोलिसांनी कुळे रेल्वे स्थानकाजवळ कंत्राटी तत्त्वावर रेल्वे दुपदरीकरणाचे काम करणाऱ्या तिघा कामगारांना अटक केली.

या तिघांना सात दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे. ही घटना ८ रोजी रात्री घडली. ९ रोजी पहाटे सना सिंग (वय २४), जयसिंग (वय ३५) आणि देवलाल अगारिया (वय २२, सर्व रा. मूळ छत्तीसगड) या कामगारांना पोलिसांनी अटक केली.

सोमवारी उशिरा रात्री हा प्रकार घडला. पीडित मुली अल्पवयीन असून त्यांची ‘एनजीओ’मार्फत कुळे पोलिसांनी जबानी घेतली आहे. पीडित मुली कामाच्या शोधात महिन्याभरापूर्वी गोव्यात आल्या होत्या.

सोमवारी घरी परतण्यासाठी चांदोर येथे रेल्वेत बसून त्या कुळे स्थानकावर उतरल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी त्या कुळेहून गावाकडे जाणारी रेल्वे पकडणार होत्या. सोमवारी सायंकाळी कुठे चहा, नाश्‍ता मिळतो का, याची चौकशी करीत असता संशयितांशी त्यांची ओळख झाली. त्या युवकांनी त्यांना रात्री जेवण देऊन तिथेच राहण्याची विनंती केली.

या मुलींना त्यांच्या पुढे कोणते संकट वाढून ठेवले आहे, याची काहीच कल्पना नव्हती. त्यांनी थेट होकार दिला. या युवकांनी रेल्वे रूळाखाली घातल्या जाणाऱ्या स्लॅबच्या तुकड्यांवर त्यांची झोपण्याची सोय केली. त्यानंतर मध्यरात्री तिघांनीही त्या दोघींवर आळीपाळीने बलात्कार केला.

या अनपेक्षित प्रकारानंतर भेदरलेल्या मुलींनी सोमवारी रात्रीच या घृणास्पद प्रसंगाची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी कुळे पोलिसांना याची माहिती देताच कुळेचे पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विभावरी गावकर यांनी घटनास्थळी येऊन तिघाही संशयितांना ताब्यात घेतले आणि तिघांवर गुन्हा नोंदविला.

पीडिता अल्पवयीन; अत्याचार झाल्याची पुष्टी

सामूहिक बलात्कार केलेल्या दोन्ही अल्पवयीन युवतींची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी संशयित युवकांचीही वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना पोक्सो न्यायालयात रिमांडसाठी नेल्याची माहिती कुळे पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT