Ganesh Chaturthi 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2022|लोटलीत चतुर्थी उत्सवात जातीय सलोख्याचे दर्शन

फादर फर्नांडिस यांच्याकडून हिंदू कुटुंबांना शुभेच्छा

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गणेश चतुर्थी हा हिंदू समाजाचा अगदी महत्त्वाचा सण. सध्या हा सण गोव्यात सर्वत्र साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर लोटलीत पॅरीश यूथ ऑफ लोटली व सेवियर ऑफ द वर्ल्ड यूथ असोसिएशन यांच्या सदस्यांनी फादर रिगन फर्नांडिस यांच्या समवेत गेल्या दोन दिवसात लोटलीतील अनेक हिंदू कुटुंबांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. याबद्दल केवळ त्या भागातच नव्हे तर सर्व गोवाभर त्यांचे कौतुक होत आहे.

(Ganesh Chaturthi Festival In Goa)

लोटलीतील हिंदू बांधवांनी त्यांचे चांगले स्वागत केले. त्यांना गणपती बाप्पाच्या पुजलेल्या मूर्तीचे दर्शन घडविले. शिवाय त्यांना चतुर्थीच्या खास खाण्याचे जिन्नस उदाहरणार्थ नेवऱ्या, लाडू, पातोळ्या, पायस सारखे गोडधोड पदार्थ खायला दिले. लोटलीतील बीग फूटचे संचालक महेंद्र आल्वारीस यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले, अशा भेटीगाठी मुळे जातीय सलोखा वृद्धिंगत होईल.

गोव्यात आताच नव्हे तर पूर्वीपासूनच हिंदू व ख्रिश्‍चन समाजामध्ये सलोखा व बंधुभाव आहे. हिंदू नाताळ किंवा इतर सणाच्या वेळी आपल्या ख्रिश्‍चन मित्रांच्या घरी जातात. तसेच चतुर्थी, दिवाळीच्या दिवसांत ख्रिश्चन लोक आपल्या हिंदू मित्रांच्या घरी जात असत व अजूनही ही परंपरा चालू आहे. मात्र आता आम्ही एकमेकाच्या घरी जातो हे सांगावे लागते. आमच्या लहानपणी आम्ही चतुर्थीच्या दोन दिवस आधीच आमच्या हिंदू शेजारी किंवा मित्रांच्या घरी जाऊन मखर रंगवणे किंवा इतर कामासाठी मदत करतात.

लोटली येथील भाजप एसटी मोर्चाचे अध्यक्ष बार्बोझा म्हणाले, चतुर्थी हा हिंदूचा सर्वांत मोठा सण. या सणामध्ये सामील होताना आम्हांला सुद्धा पुष्कळ आनंद होत आहे. गोव्यात हिंदू व ख्रिश्चन समाजामध्ये कधीही मतभेद नव्हते व नाहीत. बार्बोझा म्हणाले, चतुर्थी हा हिंदूचा सर्वांत मोठा सण. या सणामध्ये सामील होताना आम्हांला सुद्धा पुष्कळ आनंद होत आहे. गोव्यात हिंदू व ख्रिश्‍चन समाजामध्ये कधीही मतभेद नव्हते व नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly: 'दादा' विरुद्ध कोणी केला खोडसाळपणा? 'FIR' दाखल करत कडक कारवाईची केली मागणी; नेमकं प्रकरण काय?

Goa Environment: पर्यावरण दाखल्याचा निर्णय रखडला; कारापूरवासीयांत नाराजी, 18 जूनपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा

खरी कुजबुज: काँग्रेसमध्ये खरेच दोन गट?

Goa Dams Water storage: जून अर्धा संपला, धरणे मात्र रिकामीच! राज्यातील जलसाठ्यांची चिंताजनक स्थिती, साळावली धरणात फक्त 28 टक्के पाणी

Mayem Lake: मये तलावावर आता 'कायाकिंग'ची मजा; निसर्गाच्या कुशीत जलविहाराचा आनंद

SCROLL FOR NEXT