Goa vegetable supply statistics Dainik Gomantak
गोवा

Goa: ‘फलोत्पादना’मुळे भाजी उत्‍पादकांना पावले गणराय! 5 दिवसांत कमावले 23 लाख; महामंडळाकडून 1.22 कोटींची उलाढाल

Ganesh Chaturthi farmers profit: गतवर्षीच्‍या तुलनेत यंदाच्‍या गणेशचतुर्थी काळातील पाच दिवसांत स्‍थानिक शेतकऱ्यांकडून सुमारे २० टन अधिक भाजी फलोत्‍पादन महामंडळास देण्‍यात आली.

Sameer Panditrao

पणजी: गतवर्षीच्‍या तुलनेत यंदाच्‍या गणेशचतुर्थी काळातील पाच दिवसांत स्‍थानिक शेतकऱ्यांकडून सुमारे २० टन अधिक भाजी फलोत्‍पादन महामंडळास देण्‍यात आली. त्‍यातून शेतकऱ्यांनी २३.०५ लाखांचा नफा मिळवला. गतवर्षीच्‍या तुलनेत यंदाच्‍या या पाच दिवसांत महामंडळास भाजी देणारे शेतकरी, दिलेली भाजी, शेतकऱ्यांना मिळालेला नफा यांसह फलोत्‍पादन महामंडळाच्‍या आर्थिक उलाढालीतही वाढ झाल्‍याचे महामंडळाने जारी केलेल्‍या आकडेवारीतून स्‍पष्‍टपणे दिसून येते.

महामंडळाने सादर केलेल्‍या आकडेवारीनुसार, २०२४–२५ मधील गणेश चतुर्थीच्‍या पाच दिवसांत स्‍थानिक २७७ शेतकऱ्यांनी फलोत्‍पादन महामंडळास ६१.३५ टन भाजी पुरवली होती. त्‍याबदल्‍यात महामंडळाकडून त्‍यांना १८ लाख रुपये मिळाले होते. यंदाच्‍या चतुर्थी काळात पाच दिवसांत राज्‍यातील ३५२ शेतकऱ्यांनी महामंडळाला ८१.४० टन भाजी पुरवली.

त्‍याबदल्‍यात या शेतकऱ्यांना २३.०५ लाख रुपयांचा नफा मिळाला. महामंडळाच्‍या टोंक - पणजी येथील केंद्रावरून दररोज दीड ते दोन लाख, आल्‍तिनो - पणजी येथील केंद्रावरून ६० ते ८० हजार आणि पणजी मार्केटमधील केंद्रावरून ६० ते ७० हजार रुपयांची भाजी इतर स्‍टॉल्‍सना पुरवण्‍यात आली, तर २५ ऑगस्‍ट या एकाच दिवसात टोंकमधून ३.४० लाख, आल्‍तिनोतून १.६३ लाख आणि पणजी मार्केटमधून १.८४ लाखांची भाजी स्‍टॉल्‍सना देण्‍यात आल्‍याचेही आकडेवारीतून दिसते.

दरम्‍यान, गणेशचतुर्थी काळात गोमंतकीय भेंडी, काकडी, कारली, दोडकी, दुधी, तेंडली, वाल आदी भाज्‍या खरेदी करतात. त्‍यामुळे स्‍थानिक शेतकऱ्यांकडून या भाज्‍या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्‍यात आल्‍या होत्‍या, अशी माहिती महामंडळाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक चंद्रहास देसाई यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

आर्थिक उलाढाल नऊ कोटींनी वाढली!

गणेशचतुर्थी काळात मोठ्या प्रमाणात भाज्‍यांची गरज लागते. त्‍यामुळे फलोत्‍पादन महामंडळ स्‍थानिक शेतकऱ्यांसह कर्नाटकातूनही भाजीची आयात करून स्‍वस्‍त दरात ती पुरवत असते. त्‍यामुळे या काळात महामंडळाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते. गतवर्षी चतुर्थीच्‍या पाच दिवसांत ३२५ टन भाजी विक्रीच्‍या माध्‍यमातून महामंडळाने १.२२ कोटींची उलाढाल केली होती. यंदा ही उलाढाल नऊ कोटींनी वाढून १.३१ कोटींवर गेली. या काळात महामंडळाने ३४६ टन भाजीची विक्री केल्‍याचेही आकडेवारीत नमूद करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT