Ganesh Chaturthi Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

Goa Ganesh Festival: चतुर्थी जवळ आल्याने सध्या सर्वत्र या सणाची तयारी जोरात सुरू झाली आहे. डिचोलीतील सर्व चित्रशाळांमध्ये सध्या लगबग सुरू असून, मूर्तिकार रात्री जागवू लागले आहेत.

Sameer Panditrao

डिचोली: चतुर्थी जवळ आल्याने सध्या सर्वत्र या सणाची तयारी जोरात सुरू झाली आहे. डिचोलीतील सर्व चित्रशाळांमध्ये सध्या लगबग सुरू असून, मूर्तिकार रात्री जागवू लागले आहेत. कुंभारवाडा-बोर्डे येथील एका चित्रशाळेत तर ज्येष्ठ म्हणजेच तब्बल ८४ वर्षांचे मूर्तिकार रमाकांत शेटकर हेही सध्या गणेशमूर्ती रंगविण्याच्या कामात मग्न आहेत.

रमाकांत शेटकर हे पणजोबापासूनची मूर्तिकलेची परंपरा सांभाळून आहेत. त्यांच्या चित्रशाळेतील गणपतीच्या मूर्तींना आजही मागणी आहे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपणाला गणपती मूर्तिकलेची आवड निर्माण झाली आणि हळूहळू आपण या कलेत झोकून दिले.

पणजोबा, आजोबा आणि वडिलांनंतर आपण मूर्ती कलेची परंपरा चालूच ठेवली आहे. वयोमानाचा विचार करता, पूर्वीप्रमाणे शरीर साथ देत नाही. तरीही अंगातील कलाकार स्वस्थ बसू देत नाही. असे रमाकांत शेटकर यांनी सांगितले.

‘पीओपी’ बंद व्हावी!

गेल्या काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींचे आक्रमण वाढत आहे. त्यामुळे पारंपरिक मूर्तिकारांना त्याचा मोठा फटका बसत आहे. ‘पीओपी’च्या मूर्ती वेळीच बंद झाल्या नाहीत, तर पारंपरिक मातीकला आणि चित्रशाळा नामशेष होणार, अशी खंत रमाकांत शेटकर यांनी व्यक्त केली.

नव्यांना प्रशिक्षण मिळावे!

गेल्या काही वर्षांपासून मूर्तिकारांसमोर चिकण मातीची समस्या निर्माण झाली आहे. पूर्वीप्रमाणे आता चिकण माती उपलब्ध होत नाही, अशी खंत रमाकांत शेटकर यांनी व्यक्त करुन, मूर्तिकला टिकवून ठेवण्यासाठी आजच्या पिढीला प्रशिक्षण देणारी एखादी चित्रशाळा सुरू करावी, अशी मागणीही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT