Ganesh Chaturthi 2023 Goa 
गोवा

IRB तुकड्या, दहशतवाद विरोधी पथकासह गोव्यात गणेशोत्सवासाठी 3,000 पोलीस तैनात

गणेशोत्सव गोव्यातील एक सर्वात मोठा आणि थाटामाटात साजरा होणारा सण आहे.

Pramod Yadav

Ganesh Chaturthi 2023 Goa: गोव्यात गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विविध पथकांसह 3,000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये IRB तुकड्या, दहशतवाद विरोधी आणि बॉम्ब निकामी पथकांचाही समावेश आहे.

गणेशोत्सव गोव्यातील एक सर्वात मोठा आणि थाटामाटात साजरा होणारा सण आहे. अलिकडच्या काळात राज्यात निर्माण झालेल्या विविध धार्मिक तणावपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने अधिक काळजी घेतली जात आहे.

गणेशोत्सव काळात घ्यायच्या काळजीबद्दल पोलिसांच्या वतीने सार्वजनिक मंडळांसाठी यापूर्वीच नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मंडळांना उत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाची सूचना करण्यात आली आहे.

याशिवाय मंडळाच्या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली जावी, पोलीस केवळ रात्रीच्या वेळी सुरक्षा प्रदान करतील असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून राज्यात 3,000 पोलीस तैनात केले आहेत.

उत्सव काळात भारतीय रिझर्व्ह वटालियन पोलिसांच्या उत्तर आणि दक्षिण प्रत्येकी सात तुकड्या अशा 14 तुकड्या तैनात असतील.

तसेच, स्थानिक पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांसह गोवा पोलिसांचे दहशदवादी विरोधी पथक, रॅपिड फोर्स, बॉम्ब निकामी पथकातील पोलीस असे मिळून 3,000 पोलीस सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT