Ganesh Chaturthi 2023 Goa 
गोवा

चवथीची परबीं! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून गोमन्तकीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विकत न घेता मातीच्या गणेशमूर्तींना खरेदी करण्यास प्राधान्य द्या - सावंत

Pramod Yadav

Ganesh Chaturthi 2023 Goa: राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे आगमण होत आहे. आजपासून (दि.१९ सप्टेंबर) सुरु होत असलेल्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व गोमन्तकीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

चतुर्थीचा उत्सव साजरा करत असताना स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न अस्तित्वात आणूया असे आवाहन देखील यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी केले.

'राज्यातील सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. गोव्यातील सर्वांसाठी गणेशोत्सव हा मोठा सण आणि तेवढ्याच मोठ्या उत्साहात हा सण ते साजरा करतात.

गणपतीची मूर्ती मातीपासून निर्माण केली जाते, तर माटोळीसाठी विविध फळे आणि भाज्या वापरतात. चतुर्थी साजरी करत असताना आपण सर्वजणही स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करुया.'

चवथीचा बाजार ऑनलाईन मिळावा यासाठी सरकारने आता स्विगीसोबत करार केला आहे. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोमन्तकीयांनी व्होकल फॉर लोकलला प्राधान्य देत, गणेशोत्सवातील फराळ ऑनलाईन खरेदी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

चतुर्थी साजरी करत असताना स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न अस्तित्वात आणूया असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विकत न घेता मातीच्या गणेशमूर्तींना खरेदी करण्यास प्राधान्य द्या असेही सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT