Ganesh Chaturthi 2023 Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2023 : मयेच्या गावकर कुटुंबाने सांगितले पर्यावरणपूरक गणेशमूर्ती महाग का झाल्या याचे गणित

चिकण मातीतून मूर्ती साकारणारी चौथी पिढी सेवेत

दैनिक गोमन्तक

Ganesh Chaturthi 2023 : कुंभारवाडा मये येथील शशिकांत अर्जुन गावकर यांचे कुटूंब गेल्या 4 पिढ्यांपासून चिकण मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या व्यवसायात असून ही पारंपरिक कला जोपासणारे शशिकांत हे चौथ्या पिढीतील असून गेल्या 60 वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत.

शशिकांत यांनी ही कला त्यांचे वडील अर्जुन यांच्यापासून घेतली तर आज त्यांचे सुपुत्र अर्जुन त्यांना गणेशमूर्ती बनविण्याच्या कामात मदत करीत आहेत.

दरवर्षी सुमारे १७५-२०० शुध्द चिकण मातीच्या गणेशमूर्तीं बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वडील आणि मुलगा अहोरात्र मेहनत घेतात.

यावर्षी दोघांनी मिळून आतापर्यंत सुमारे १५० च्या आसपास मूर्ती तयार केल्या असून आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी काही मोजक्या मूर्ती त्यांना बनवायच्या आहेत.

कुंभारवाड्यातील 50 कुटुंबे मूर्ती व्यवसायात

कुंभारवाड्यातील सुमारे ६५ पैकी अंदाजे ५० कुटुंबे चिकण मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसायात असून मये, डिचोली व सभोवतालच्या परिसरातील जास्तीत जास्त लोक या ठिकाणाहून चिकण मातीच्या गणेशमूर्ती खरेदी करतात.

माती महाग; मूर्ती दरवाढही शक्य !

गावकर कुटुंबीय पूर्वी बोर्डे डिचोली येथील शेतमालकांकडून चिकण माती खरेदी करायचे. मात्र, आता डिचोली येथे चिकण मातीच्या टंचाईमुळे वारखंड पेडणे येथून माती आणली जाते.

१० मीटर माती खरेदी करण्यासाठी वाहतूक शुल्काव्यतिरिक्त सुमारे रु. १७००० मोजावे लागल्याची माहिती अर्जुन गावकर यांनी दिली.

शिवाय रंगांचेही दर भरमसाठ वाढल्याने मूर्तिकारांना यंदा मूर्तींचेही दर वाढवावे लागणार यात तिळमात्रही शंका नाही.

सध्या चिकण मातीच्या मूर्तीचे दर आकारानुसार रू.१००० ते रु. ७००० रु.पर्यंत असल्याचे गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT