पारंपरिक विसर्जन स्थळांची गणेशभक्तांकडून साफसफाई (Ganesh Chaturthi 2021) दैनिक गोमन्तक
गोवा

Ganesh Chaturthi 2021: गणपती विसर्जन स्थळी जाणाऱ्या पायवाटेची साफसफाई

पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे उद्या (मंगळवारी) विसर्जन

दैनिक गोमन्तक

Ganesh Chaturthi 2021: पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे उद्या (मंगळवारी) विसर्जन होणार आहे (5th Day of Ganesh Immersion). मंगलमूर्ती गणरायाचे विसर्जन सुरळीतपणे होण्यासाठी डिचोलीतील (Ganesh Visarjan at Bicholim) विविध भागात गणेशभक्त तयारीला लागले असून, पारंपरिक विसर्जन स्थळांची (Ganesh Immersion place) गणेशभक्तांकडून साफसफाई करण्यात आली आहे. डिचोलीतील धुमासे, लाडफे, कासारपाल, मुळगाव, सर्वण, मये आदी बहूतेक भागात पाच दिवसांची चतुर्थी साजरी करण्यात येत आहे.

सर्वण येथे पायवाटेची साफसफाई

सर्वण येथे पारंपरिक नदीवर गणेश विसर्जन करण्यात येते. गावातील श्री श्यामपुरुष मंदिरापासून नदीकडे जाणारी पायवाट साधारण एक किलोमीटर अंतराची आहे. काही ठिकाणी ही पायवाट अडगळीची आहे. त्यातच ही पायवाट वेलीझुडपांनी वेढली होती. स्थानिक पंच गोकुळदास सावंत यांनी पुढाकार घेवून पायवाटेच्या बाजूची झाडेझुडपे छाटून साफसफाई केली आहे.

या साफसफाई कामात भाजयुमोचे सीताराम सावंत, संतोष सावंत, सगुण सावंत आदी युवकांनी सहकार्य केले. दरम्यान,नदीकाठची भाटातील अडगळीची वाट संबंधित भाटकार मार्कूस फर्नांडिस यांच्याकडून स्वच्छ करण्यात आली आहे. विसर्जन स्थळाकडे जाणाऱ्या पायवाटेची साफसफाई केल्यामुळे गावातील गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT