G-20 Summit| Dainik Gomantak
गोवा

G-20 Summit: अभिमानास्पद ! जी-20 शिखर परिषदेच्या काही बैठका गोव्यात होणार

गोव्यात कित्येक वर्षांनी जी-20 शिखर परिषदेच्या काही बैठका होणार आहेत, ही गोमंतकीयांसाठी उत्साहवर्धक गोष्ट असल्याने नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: भारतीय जनता पक्षाच्या मडगाव मंडळाने भारताला मिळालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन तसेच या शिखर परिषदेसंदर्भात लोकांमध्ये जागृती करण्यासाठी काल मडगाव नगरपालिकेच्या इमारतीसमोर कार्यक्रम आयोजित केला होता.

भारताला अध्यक्षपद मिळाले ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. गोव्यात कित्येक वर्षांनी जी-20 शिखर परिषदेच्या काही बैठका होणार आहेत, ही गोमंतकीयांसाठी उत्साहवर्धक गोष्ट असल्याने नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, नगरसेवक महेश आमोणकर, भाजप मडगाव मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, पक्षाचे प्रवक्ते शर्मद रायतुरकर, मडगाव भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा तनुजा पैंगीणकर व फातोर्डाच्या अध्यक्ष आशा गावस उपस्थित होते.

जग एक आहे, असे पंतप्रधान मोदीजी मानतात. नगरपालिकेसमोर काढण्यात आलेल्या रांगोळीत पृथ्वी रेखाटलेली आहे तसेच वसुधैव कुटुंबम: असे लिहिले आहे. - रंजिता पै, भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पोर्तुगीज फुटबॉलपटूसोबत सेल्फीचा मोह भोवला, केरळच्या फॅनला पोलिस स्थानकात काढावी लागली रात्र; FC Goa ला होऊ शकतो 8 लाखांचा दंड

Narkasur: श्रीकृष्णाऐवजी 'नरकासुराचाच' उदो उदो का होतोय?

Prashanti Talpankar: गोव्याच्या 'प्रशांती'ची भरारी! IFFSA टोरंटो येथे ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, Video

Kelbai Goddess Statue: अद्भुत! पर्येतील वाळवंटी नदीत आढळली 'केळबाय देवी'ची कदंब राजवटीतील पुरातन मूर्ती

Goa School: गोवा शिक्षण खात्याचा अजब कारभार! सरकारी शाळा दिली कर्नाटकमधील मठाला, कातुर्ली-तुयेतील प्रकार

SCROLL FOR NEXT