Goa Petrol Price
Goa Petrol Price  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Price: अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किमतीत वाढ, जाणून घ्या गोव्यातील दर...

दैनिक गोमन्तक

पेट्रोल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने उत्पादनात कपात केल्यानंतर आता कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. शनिवारी पुन्हा एकदा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 94.42 पर्यंत वाढली आहे, तर WTI प्रति बॅरल $ 88.53 वर पोहोचला आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.

(Fuel price hike in many states, know rates in Goa)

काही राज्यांमध्ये किमतीत चढ-उतार दिसून आले आहेत. मात्र, देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये दरात कोणताही बदल झालेला नाही. गोव्यात पेट्रोलचा दर 97.90 लिटर आणि डिझेलचा दर 90.44 लिटर झाला आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.90

  • Panjim ₹ 97.90

  • South Goa ₹ 97.22

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.44

  • Panjim ₹ 90.44

  • South Goa ₹ 89.79

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागले आहे.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT