Arrest Dainik gomantak
गोवा

Crime News : स्वच्छतागृहाच्या वापरावरून पुण्यातील पर्यटकास मारहाण

रात्री पुणे येथील पर्यटक तसेच ‘सॉरो’ नामक रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांमध्ये स्वच्छतागृहाचा वापर करण्यावरून वादविवाद झाल्याने ही घटना घडल्याची माहिती हणजूण पोलिसांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News : शिवोलीबा र्देशातील आसगाव-चार रस्ता येथे एका खासगी रेस्टॉरंटमध्ये उतरलेल्या नितेश अनिल खरे (३२, वखाड-पुणे) या पर्यटकास क्षुल्लक कारणावरून रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची रितसर तक्रार हणजूण पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

रविवारी (ता.८) रात्री पुणे येथील पर्यटक तसेच ‘सॉरो’ नामक रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांमध्ये स्वच्छतागृहाचा वापर करण्यावरून वादविवाद झाल्याने ही घटना घडल्याची माहिती हणजूण पोलिसांनी दिली.

दरम्यान, पर्यटक नितेश खरे आपल्या अन्य सहकारी मित्र आर्यन श्रीवास्तव, रुचिरा गुप्ता तसेच गौतमी नगरकर यांच्यासहित आसगाव चाररस्ता येथील ‘सॉरो’ नामक रेस्टॉरंटमध्ये उतरले असता स्वच्छतागृहाचा वापर करण्यावरून त्यांचा तेथील कर्मचाऱ्याशी वाद झाला असता

तांबडी टोपी तसेच काळा टीशर्ट परिधान केलेल्या रेस्टॉरंटच्या एका बाउन्सरकडून नितेश खरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यावेळी, नितेशच्या कपाळावर त्या बाउन्सरकडून काचेची बाटली फोडण्यात आल्याने या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले.

यावेळी नितेशच्या मदतीसाठी धावून गेलेल्या त्यांच्या मित्रांनाही त्या बाउन्सरकडून मारहाण करण्यात आल्याची माहिती हणजूण पोलिसांनी दिली.संशयितांची रवानगी पोलिस कोठडीत

हणजूण पोलिसांकडून यासंबंधात कारवाई करताना परप्रांतीय संजय श्रीमोहन पाल (सध्या राहणारा वेर्ला-काणका) तसेच मंजुनाथ आला नाईक (मयडे-हळदोणा) यांच्याविरोधात

भारतीय दंड संहितेच्या ३०७ तसेच ३२३ कलमांनुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT