Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: ...अन् केळबाय देवीचा कळस रोखला

Goa Culture: आजपासून घरोघरी फिरणार कलश: कळसोत्सवाबाबत संभ्रम

दैनिक गोमन्तक

Goa Culture

मयेतील श्री महामाया देवीच्या मंदिरात गुरुवारी केळबाय देवीचा कळस अबोलीच्या फुलांनी सजविण्यात आला होता. सायंकाळी कळस मंदिराबाहेर काढून मोडाच्या डोक्यावर ठेवण्यात आला.

पारंपरिक गाऱ्हाणे घातल्यानंतर अवसारी मोडासह वाजतगाजत देवीच्या कळसाचे केळबायवाडा येथील श्री केळबाय मंदिराच्या दिशेने प्रस्थान झाले. केळबाय मंदिराकडे कळस येताच नाईक गटातील महिला आणि पुरुषांनी प्रवेशद्वारावरच मोडासहीत कळस रोखून धरला.

गेल्या वर्षी माल्याच्या जत्रेवेळी मंदिर बंद करण्याच्या प्रकरणाचे पडसाद यावेळी उमटले. नाईक गटातील लोकांनी अवसारी मोडाला त्याचे कारण विचारले. न्याय द्या आणि नंतरच मंदिरात या, अशी नाईक गटातील लोकांची भूमिका होती.

जवळपास अर्धा तास कळस रोखून धरण्यात आल्यानंतर कळसासह मोड आणि भाविक माघारी फिरले. नंतर कळसाचे श्री सातेरी मंदिरात आगमन झाले. उद्यापासून (शुक्रवारी) घरोघरी कलश फिरल्यानंतर शुक्रवारी (ता. २२) कलशाचे श्री महामाया मंदिरात आगमन होणार आहे.

त्या ठिकाणी कौलोत्सवाने या उत्सवाची सांगता होणार आहे. मात्र, केळबाय देवीच्या मंदिरात कळसाला प्रवेश दिला नसल्याने कळसोत्सव निर्विघ्नपणे साजरा होणार की नाही, त्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT