'Meri Mati, Mera Desh' Dainik Gomantak
गोवा

'Meri Mati, Mera Desh': ‘मेरी माटी, मेरा देश’मधून सर्वधर्म समभाव जपू

'Meri Mati, Mera Desh': मुख्यमंत्री सावंत: राज्यभरातून जमवलेल्या मातीचे कलश दिल्लीला रवाना

दैनिक गोमन्तक

'Meri Mati, Mera Desh': राज्यातील विविध तालुक्यांतून ‘मेरी माटी मेरा देश'' या उपक्रमासाठी आलेल्या मातीचे येथील विविध धार्मिक पद्धतींप्रमाणे पूजन करण्यात आले. त्यानिमित्ताने सर्वधर्म समभाव दिसून आला आणि तोच सर्वधर्म समभाव जोपासण्याचे काम करावे लागणार आहे, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

नव्या संसद भवनाच्याजवळ स्मृतिस्थळ उभारले जाणार आहे. सर्व देशभरातून संकलित केलेली माती स्मृतिस्थळाच्या पायाभरणीत वापरली जाणार आहे. कन्याकुमारीपासून काश्‍मीरपर्यंत हा एक देश आहे. जाती, भाषा, प्रदेश वेगवेगळा असला तरी आम्ही एक आहोत, निर्माण होणारे शिल्प अखंड भारताचे प्रतीक असेल,असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्वातंत्र्य अमृतमहोत्सवानिमित्त पंचायत संचालनालयातर्फे आझाद मैदानावर आयोजित ‘मेरी माटी मेरा देश'उपक्रमांतर्गत मातीपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री नीलेश काब्राल, मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री रोहन खंवटे, खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार संकल्प आमोणकर, उल्हास तुयेंकर,

राजेश फळदेसाई, डॉ. दिव्या राणे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, दामू नाईक, पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, जि. पं. सदस्य, बीडीओंची उपस्थिती होती.

बाराही तालुक्यांतील मातीचे पूजन

राज्यातील बाराही तालुक्यांतून आणलेल्या मातीचे हिंदू, ख्रिस्ती आणि मुस्लिम धार्मिक विधीनुसार पूजन करण्यात आले. त्यानंतर ही माती नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांकडे सुपूर्द केली. सुरुवातीला गणेशवंदना, समईनृत्य आणि फुगडी कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT