Free Wifi Service by MGP in Goa Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकार अपयशी, म्हणुन आम्ही WiFi सेवा देतोय: प्रवीण आर्लेकर

कोरगाव येथील प्रज्ञा हायस्कूल येथे मोफत इन्टरनेट (Free Internet) सेवेचा कार्यक्रम मगो पक्षाचे पेडणेचे नेते प्रवीण आर्लेकर यांच्या मार्फत गुरुवारी पार पडला.

दैनिक गोमन्तक

सरकारने ग्रामीण भागातील विधार्थ्यांसाठी इन्टरनेट सेवा (WiFi) मिळते कि नाही याचा अभ्यास न करता किंवा पालक विधार्थी आणि शाळा व्यवस्थापन याना विश्वासात न घेता सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरु करून ज्याना इन्टरनेट मिळत नाही त्यांच्यावर अन्याय सरकारने केला, जिथ नेट मिळत नाही तिथ सरकार आणि स्थानिक आमदारही अपयशी ठरला, सरकारला जमत नसल्याने ही सेवा मागणीनुसार केल्याचे मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले. (Free Internet Service by MGP)

कोरगाव येथील प्रज्ञा हायस्कूल येथे मोफत इन्टरनेट सेवेचा कार्यक्रम मगो पक्षाचे पेडणेचे नेते प्रवीण आर्लेकर यांच्या मार्फत गुरुवारी पार पडला.

मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना सरकारने विधार्थ्यावर अन्याय केला आहे , इन्टरनेट सेवा नसल्याने विधार्थ्याना जेवढा त्रास होता तेवढाच त्यांच्या पालकाना होतो. विधार्थी मिळेल तिथे नेट जातात आणि त्यात त्यांचा वेळीहि वाया जात आहे. यावर सरकारने काहीच उपाययोजना आखलेली नाही , सरकारला बहुजन समाजाचे पडलेले नाही असा दावा प्रवीण आर्लेकर यांनी केला . शिक्षणासाठी योग्य त्या सोयी आम्ही याहीपुढे पुरवणार असे सांगितले.

उमेश तळवणेकर यांनी बोलताना मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांचे एक व्हिजन आहे त्यानुसार ते कार्यरत आहेत , या योजना सरकारने पुरवायला हव्या होत्या मात्र त्यांनी पुरवल्या नाहीत , सरकारला बहुजन समाजाच्या मुलाना अशिक्षित ठेवायचे असा आरोप करून , या मतदार संघातून निवडून आलेला आमदार या सोई पुरवण्यास अपयशी ठरले. आता प्रवीण आर्लेकर यांनाच लोकप्रतिनिधी बनवण्याची गरज आहे असे सांगितले. नको तिथ सरकार पैसा वाया घालवत आहे, या ठिकाणी गरज होती, ती सेवा सरकार पुरवत नसल्याने आता आमदार बदल्याची गरज आहे असे सांगितले.

पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष महादेव गवंडी यांनी बोलताना विद्यार्थ्यांची गरज ओळखून ही सेवा उपलब्ध करून आर्लेकर यांनी दिल्याबद्दल समाधान व्यक्त करून, या सेवेचा विधार्थ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन गवंडी यांनी केले.

यावेळी हायस्कूलचे चेरमेम नकुल म्हामल, मुख्याध्यापिका मिनी पी.एस ,प्रकाश मुचंडी , पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष महादेव गवंडी, उमेश तळवणेकर, नरेश कोरगावकर ,माजी सरपंच सुदीप कोरगावकर उपस्थित होते .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT