Dengue Cases in Goa Dainik Gomantak
गोवा

Dengue Cases in Goa: किनारी भागात डेंग्यू रुग्णांची झपाट्याने वाढ! कळंगुट पंचायतीतर्फे मोफत डेंग्यू चाचणी सुरू

किनारी पट्ट्यातील डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ

Kavya Powar

Dengue Cases in Goa: संपूर्ण देशभरात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. सध्या गोव्यातही याची साथ पसरत आहे. काही दिवसांपूर्वी कळंगुटमध्ये डेंग्यूमुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. किनारी पट्ट्यातील डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कळंगुट पंचायतीने रहिवाशांसाठी मोफत डेंग्यू चाचणी जाहीर केली आहे.

कळंगुट पंचायत कार्यक्षेत्रात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने पंचायत पुढील चाचण्या मोफत करणार आहे. NS1 डेंग्यू चाचणी, IgG, IgM, डेंग्यू चाचणी सल्लामसलत आणि प्लेटलेट मोजणी, सोमवार ते शनिवार सकाळी 9.30 ते 11 दरम्यान कळंगुट पंचायत कॉन्फरन्स हॉलमध्ये विनामूल्य करण्यात येणार आहे.

कांदोळी PHCचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिवकर यांच्याकडून या चाचण्या केल्या जातील, अशी माहिती कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी दिली. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कळंगुट-कांदोळी बीचवर देखरेख करणाऱ्या ग्रामपंचायती आणि कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी आवाहन केले होते.

याबाबत नागरिकांनीही स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांनी त्यांच्या सभोवतालचे साचलेले पाणी तपासले पाहिजे आणि कोणतेही कंटेनर रिकामे केले पाहिजेत. तसेच लक्षणे वेळेवर ओळखल्यास वैद्यकीय उपचारांना मदत होईलआणि रोगाचा प्रसार देखील टाळता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Post Monsoon Rain Update: 107 वर्षांतील निचांकी मान्सूननंतर गोव्याला आता परतीच्या पावसाचीही हुलकावणी; मान्सूनोत्तर पाऊस 99 टक्क्यांनी घटला!

Goa Winter Tourism: गोव्यात हिवाळी पर्यटनाची दणक्यात सुरुवात! मॉस्कोहून 285 पर्यटकांसह दुसरे चार्टर विमान दाबोळीत दाखल

Andhra Pradesh Boiler Explosion: आंध्र प्रदेशातील कारखान्यात भीषण स्फोट; नावात साधर्म्य असल्याने गैरसमज, औषध कंपनीने मांडली आपली बाजू

Goa Politics: 'एक कचोरी, दोन समोसा, काँग्रेस आमदारांचा काय भरोसा?'; निवडणुकांआधी 'आप'चा काँग्रेसवर जोरदार घणाघात!

Goa Accident: गुगल मॅपची वाट, कोलवाळात घात! मद्यधुंद स्‍कॉर्पिओचालकाची स्कूटरला धडक; मुंबईतील महिला पर्यटकाचा मृत्यू, पती अन् मुलगी जखमी

SCROLL FOR NEXT