The fourth mayor was elected today during the tenure of the Fonda Municipal Board.
The fourth mayor was elected today during the tenure of the Fonda Municipal Board. 
गोवा

फोंडा पालिकेत मगो, गोवा फॉरवर्डचे वर्चस्व; मुख्यमंत्र्यांची नाचक्की!

दैनिक गोमंतक

फोंडा: फोंडा (Ponda) पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी (Mayor) भाजप विरोधात भाजप अशी झालेली टक्कर फोंडावासीयांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. भारतीय जनता पक्षात (BJP) गेली अनेक वर्षे काम करून शेवटी पक्षाच्या विरोधात ठाकण्याचा प्रकार शांताराम कोलवेकर यांच्याकडून घडल्याने यामागे नेमके काय राजकारण (Politics) आहे, याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या राजकारणामागे नेमके काय आहे हे जरी बाजूला सारले, तरी सत्तेवर असलेल्या भाजपसाठी ही जोरदार चपराक आहे. (Fourth mayor was elected today during the tenure of the Fonda Municipal Board.)

फोंडा पालिका मंडळाच्या कार्यकाळात चौथ्या नगराध्यक्षाची निवड करण्यात आली. या कार्यकाळातील निवडणुकीत (Election) सुरवातीला मगो पक्षाने आठ नगरसेवकांच्या पाठिंब्याचा दावा करीत नगराध्यक्षपद आपल्याकडे घेतले होते. त्यावेळी प्रदीप नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, व्यंकटेश नाईक यांनी बंड करून प्रदीप नाईक यांना नगराध्यक्षपदावरून हटवले. त्यावेळी भाजपमध्ये कोण किती काळ नगराध्यक्षपदी असावा यासंबंधीचा अंतर्गत करार झाला होता, असे समजते. व्यंकटेश नाईक नगराध्यक्ष झाल्यामुळे पुन्हा एकदा सत्ता भाजपकडे आली होती.

मध्यंतरीच्या काळात आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक तसेच आनंद नाईक व विलियम आगियार हे अन्य दोन नगरसेवक मिळून तीन कॉंग्रेसच्या नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश दिला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजपच्या ज्येष्ठ पुढाऱ्यांनी संमती दिली. त्यामुळेच राजधानीत हा प्रवेश सोहळा झाला होता. त्यावेळी झालेल्या अंतर्गत करारानुसार सुरवातीला विश्‍वनाथ दळवी व त्यानंतर रितेश नाईक यांना नगराध्यक्षपद अपेक्षित होते. 

नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांचा कार्यकाळ संपल्यानंतर उपनगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी नगराध्यक्ष झाले आणि रिक्त असलेल्या उपनगराध्यक्षपदासाठी आनंद नाईक यांनी उमेदवारी दाखल केली. मात्र, दुसऱ्या बाजूला मगोच्या अमिना नाईक यांनी उमेदवारी दाखल केल्याने व व्यंकटेश नाईक व चंद्रकला नाईक विरोधात गेल्याने जमून आलेले भाजपचे गणित फिसकटले. त्यानंतर पुन्हा एकदा अमिना नाईक यांना हटवून मगोतील दोघांना भाजपने आटापिटा करीत आपल्यात ओढले आणि वीरेंद्र ढवळीकर यांना उपनगराध्यक्षपद दिले. एवढे सगळे आलबेल चाललेले असतानाच शांताराम कोलवेकर यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा करून बंड पुकारल्याने आता फोंड्यातील राजकारण ढवळून निघाले असून भाजपविरोधात भाजप अशा लढतीत शेवटी मगोने बाजी मारली. 

फोंड्यात मुख्यमंत्र्यांची नाचक्की!
फोंडा पालिका निवडणुकीत मागच्या काळात ज्या पद्धतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांच्या कोअर कमिटीने स्वतः लक्ष घालून फोंडा पालिकेत सत्ता राखून ठेवली होती, तो करिष्मा यावेळेला दिसला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आणि एकापरीने भारतीय जनता पक्षाच्या फोंड्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांची फोंड्यात नाचक्की झाली आहे. 

शांताराम कोलवेकर यांना भाजप मंडळ अध्यक्षपदावरून हटवले!
भारतीय जनता पक्षाच्या फोंडा मंडळ अध्यक्षपदाचा ताबा असलेल्या शांताराम कोलवेकर यांना अखेर मंडळ अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. पूर्ण फोंडा भाजप मंडळच बरखास्त करण्यात आले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी ही कारवाई केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT