Panjim Accident Dainik Gomantak
गोवा

Panjim Accident: पणजी 'स्मार्ट सिटी'तला चौथा अपघात! रस्ता खचल्याने ट्रक कलंडला

अपघात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Accident स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पणजीत सध्या रस्त्यांची कामे सुरु असून जागोजागी खोदाई केली आहे. या ठिकाणी रस्ते खचून वाहने कलंडल्याच्या घटना घडत आहेत. आज पुन्हा अशीच घटना सेंट इनेज चर्च जवळ घडली आहे.

या ठिकाणी सीवेज सक्शन ट्रक पुन्हा कलंडला आहे. या अपघात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. सीवेज सक्शन ट्रक कलंडल्याची दुसरी तर रस्ता खचण्याची ही चौथी घटना आहे.

या अगोदर काकुलो मॉल परिसरात जांभ्या विटांची वाहतूक करणारा ट्रक भररस्त्यात उलटला होता. त्या घटनेत 4 कामगार गंभीर जखमी झाले होते. तर दुसरी घटना सांतिनेज टोक परिसरात घडली होती.

या घटनेत सीवेज सक्शन ट्रक रस्ता खचल्याने कलंडला होता. तर तिसऱ्या घटनेत पणजीतील आझाद मैदान परिसरात सिमेंट पाईप घेऊन जाणारा ट्रक मागील चाके खड्ड्यात गेल्याने कलंडला होता.

या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदरची कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत असा सूर जनतेतून उमटत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT