Dharbandora Dainik Gomantak
गोवा

Dharbandora: पेटके - धारबांदोडा येथे चार डुक्करांची कत्तल, चौकशीसाठी दोन संशयित ताब्यात

याठिकाणावरून 80 किलो मांस जप्त करण्यात आली आहे.

Pramod Yadav

पेटके - धारबांदोडा येथे चार डुक्करांची कत्तल करण्यात आली आहे. वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, त्यांना 13 डुक्कर जिवंत सापडले तर, चार डुक्करांची कत्तल करण्यात आली होती. पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले असून, चौकशीसाठी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, मांस विक्रीसाठी डुक्करांची कत्तल केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Dharbandora

वन परिक्षेत्र अधिकारी (Range Forest Officer) नारायण प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेटके - धारबांदोडा येथील सर्व्हे नंबर 206 याठिकाणी रानटी डुक्कर आणून त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

अधिकाऱ्यांनी तात्काळ येथे छापा टाकून पाहणी केली असता, त्यांना चार डुक्करांची कत्तल केल्याचे आढळून आले. तसेच, त्यांचे मांस सर्वत्र पडले होते आणि काही मांस प्लॅस्टिक पिशवी व बॅरलमध्ये साठवून ठेवण्यात आल्याचे पडताळणीत दिसून आले.

शिवाय येथे 13 डुक्कर जिवंत सापडले आहेत. डुक्करांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती प्रभुदेसाई यांनी दिली आहे. याठिकाणावरून 80 किलो मांस जप्त करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी याठिकाणी छापा टाकून पाहणी केली असता, डुक्करांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करून मांस इतरत्र पडल्याले दिसून येत आहे. शिवाय कत्तलीसाठी वापरण्यात आलेले विविध हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.

जिंवत असलेल्या डुक्करांचे पाय बांधून त्यांना एकत्र जमिनीवर ठेवण्यात आल्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.

दरम्यान, कत्तलीसाठी आणण्यात आलेली डुक्करे गावठी की जंगली आहेत याची देखील तपासणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT