Four lakh tools to Gomeco by Rotary
Four lakh tools to Gomeco by Rotary 
गोवा

रोटरीतर्फे गोमेकॉला चार लाखांची साधने

गोमंतक वृत्तसेवा

पणजी : रोटरी क्लब मिरामार या सेवाभावी संस्थेतर्फे महालक्ष्मी ट्रस्ट आणि राधाबेन कक्कोभाय व दामोदर झुठालाल रजनी  चॅरिटेबल ट्रस्टच्या सौजन्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलला चार लाख रुपये किमतीची साधने दान करण्यात आली.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांच्याकडे ही साधने प्रमुख पाहुणे, रोटरीचे जिल्हा प्रांतपाल संग्राम पाटील,प्रथम महिला उत्कर्षा पाटील, भावी जिल्हा प्रांतपाल गौरीश धोंड यांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात आली. त्यात, दहा फॉवलर बेड, दहा एसेस रेलिंग, दहा स्ट्रेचर ट्रॉली, दहा फोर बार एसेस व चार फिंगर पल्स ऑक्सिमिटरचा समावेश आहे. रोटरी क्लब मिरामारचे अध्यक्ष कमलेश अमलानी,उपाध्यक्ष शांतेंदु मोहिते, सचिव डॉ. नॉवेल ब्रिटो,सिद्धार्थ देशपांडे, सहसचिव सागर कुलकर्णी, रोटरी पणजीचे अध्यक्ष कार्लीटो मार्टिन्स, माजी अध्यक्ष मनिषा सरदेसाई व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


डॉ. शिवानंद बांदेकर यांनी यावेळी रोटरी क्लब मिरामारच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांबद्दल संस्थेला दुवा दिला. ते म्हणाले,आजच्या घडीला आम्हाला या साधनांची गरज होती व याचवेळी ही साधने आम्हाला मिळाल्याने त्याचा फारच उपयोग  होईल. गौरीश धोंड यांनी सांगितले, की रोटरीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी गोमेकॉला आवश्यक  साधने दान दिली आहेत व यापुढेही आमचे सहकार्य राहील.
संग्राम पाटील यांनी रोटरी क्लब मिरामार राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करुन गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलला फॉवलर बेड ची कमतरता भासल्यात आम्ही कोल्हापूर येथून रोटरीच्या माध्यमातून पाठवू असे सांगितले.

पोलिओमुक्त मोहिमेचाही शुभारंभ
रोटरी क्लब मिरामारच्या पोलिओ मुक्त मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलचे अधिष्ठाता 
डॉ. शिवानंद बांदेकर यांना पोलिओ समाप्ती बिल्ला लावून प्रांतपाल संग्राम पाटील यांच्या साक्षीने या मोहिमेला सर्व  स्तरांतून शुभारंभ करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT