Four Keralite youths arrested with drugs at Thivi railway station Dainik Gomantak
गोवा

थिवी रेल्वे स्थानकावर चार केरळी युवकांना आम्ली पदार्थांसह अटक

युवक केरळला जाणारी गाडी पकडायला स्टेशनवर आले होते . पोलिसांना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळ मधील एका व्यक्तीने त्यांना हे ड्रग्स घेऊन यायला सांगितले होते

Abhijeet Pote

मडगाव: कोंकण रेल्वे पोलिसांनी आज सकाळी थिवी (म्हापसा) रेल्वे स्थानकावर केलेल्या कारवाईत केरळच्या 4 युवकांना ड्रग्ससह अटक केली असून त्यांच्याकडून 45 हजारांचे अमली पदार्थ जप्त केले असल्याची माहिती मिळत आहे.अटक केलेल्या युवकांची नावे महमद अस्लम (26), नर्दीशा के. ए. (24), शफी व्ही. एच. (27) आणि महमद उनाय (24) अशी असून ते चारही जण थ्रिसुर केरळ येथील असल्याची माहिती कोंकण रेल्वेचे पोलीस निरीक्षक हिरू कवळेकर यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी कोंकण रेल्वेने जाणाऱ्या एका महिलेचे 10 लाखांचे दागिने चोरीस गेले होते. त्यामुळे सर्व स्थानकांवर पोलीस पहारा वाढविण्यात आला होता. कुणी संशयित आढळल्यास त्यांची कसून चौकशी केली जात होती.आज सकाळी हे चारही युवक संशयास्पद रीतीने फिरत असताना पोलिसांनी त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यांच्याकडे 7 ग्राम एमएमडीए, 20 ग्राम चरस आणि 6 ग्राम गांजा सापडला आहे.

हे युवक केरळला जाणारी गाडी पकडायला स्टेशनवर आले होते . पोलिसांना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळ मधील एका व्यक्तीने त्यांना हे ड्रग्स घेऊन यायला सांगितले होते. आणि त्यांनी ते अंजुणा येथे विकत घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT